एक्स्प्लोर

Salman Khan : सलमान खानकडे पाच कोटी मागणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, झारखंडमधून आरोपीला बेड्या

Salman Khan Death Threat : लॉरेन्स बिश्नोईसोबत तडजोड घडवून आणण्याचा दावा करत सलमान खानला धमकी देत पाच कोटीची मागणी करणाऱ्या आरोपीला झारखंडमधून अटक करण्यात आली आहे.

Salman Khan vs Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्याला मुंबईच्या वरळी पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी झारखंडमधील जमशेदपूर येथून ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव जोहर शेख आहे, तो जमशेदपूरमध्ये भाजीविक्रेत्याचे काम करतो. त्याने अलीकडेच टीव्हीवर सलमान खानला मारण्याची धमकी दिल्याची बातमी पाहिली होती, ज्यामुळे त्याला वाटलं की सलमान खानला धमकी देऊन त्याच्याकडून पैसे उकळता येतील.

सलमान खानकडे पाच कोटी मागणाऱ्याला पोलिसांच्या बेड्या

आरोपीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमान खानसाठी धमकीचा मेसेज पाठवला होता आणि त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद केला होता. या मेसेजमध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या सामंजस्य करवून देण्यासाठी आरोपीने पाच कोटींची खंडणी मागितली होती. मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

धमकी देत मागितली पाच कोटींची खंडणी

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो नंबर बंद होता. तांत्रिक मदतीने तपास केला असता हा मेसेज जमशेदपूर येथून आल्याचे आढळून आले. त्यानंतर जमशेदपूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास करण्यात आला आणि आज मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.

Man Who Sent Death Threat To Salman Khan Arrested From Jharkhand

आधी धमकी मग मागितली माफी

आधी त्याने धमकी दिली आणि नंतर काही दिवसांनी पोलिसांना त्याच व्हॉट्सॲप नंबरवरून दुसरा मेसेज आला ज्यामध्ये धमकी देणाऱ्या आरोपीने माफी मागितली. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने चुकून हा मेसेज पाठवला असून त्याबद्दल त्याला खेद वाटत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. व्हॉट्सॲप मेसेजवर धमकी दिल्यानंतर आरोपीने काही दिवसांनी माफी मागत चुकून मेसेज पाठवल्याचं म्हटलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये अभिनेता सलमान खानकडून लॉरेन्स बिश्नोईशी असलेले दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दावा केला होता की, तो सलमान आणि लॉरेन्स गँगमध्ये समेट घडवून आणेल, त्यासाठी त्याने पैसे मागितले आणि जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, अशी धमकीही त्याने दिली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : 'मी काळवीटाची शिकार केली नाही', बिश्नोई गँगच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा VIDEO व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Sejal Pawar Controversy: सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
सेजलची चौकशी होणार, 5 सदस्यीय समिती स्थापन; प्रणित मोरेच्या शोमधील 'टॉक' डॉक्टर युवतीच्या अंगलट
Gulabi Saadi: 'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
'गुलाबी साडी' सुपरहिट ठरलं, पण मानधन.., प्राजक्ता घागनं सांगितला खास किस्सा
Prem Bhati Death: वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू
वडिलांना सांगितलं 10 मिनिटांत येतो, पण नियतीच्या मनात...पत्नीला माहेरी सोडून परतल्यानंतर प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा अपघाती मृत्यू
Deool Band 2: 'देऊळ बंद 2' सिनेमाचा दबदबा कायम; चौथ्या आठवड्यातही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी, शनिवारी किती कोटी कमावले?
'देऊळ बंद 2' सिनेमाचा दबदबा कायम; चौथ्या आठवड्यातही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी, शनिवारी किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget