Salman Khan : सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन; भाईजानने फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Salman Khan : सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन झालं आहे.
![Salman Khan : सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन; भाईजानने फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली Salman Khan body double Sagar Pandey passes away Bhaijaan paid tribute by sharing a photo Salman Khan : सलमान खानचा बॉडी डबल सागर पांडेचं निधन; भाईजानने फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/30/96e37f166973248247c480a531b87a6c1664554242189254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Salman Khan Body Double Died : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बॉडी डबल सागर पांडेचं (Sagar Pandey) निधन झालं आहे. जीममध्ये व्यायाम करत असाताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपूर्वी विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनादेखील जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 40 दिवसांनी 21 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले. भाईजानच्या 'बजरंगी भाईजान', 'प्रेम रतन धन पायो' यांसारख्या अनेक बिग बजेट सिनेमांसाठी सागर पांडेने सलमानचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं आहे.
View this post on Instagram
सलमान खानचा बॉडी डबल म्हणून सागर खूप लोकप्रिय होता. देशभरातच आणि तर जगभरात तो अनेक कार्यक्रमांत सहभागी व्हायचा. सागरचा खास मित्र आणि शाहरुख खानचा बॉडी डबल राजू रायकवार एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सागरला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले".
सागर उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. कोरोनाकाळात सागरला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यावेळी सलमानने त्याला आर्थिक मदत केली होती. सलमान खाननेदेखील सागरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
संबंधित बातम्या
Amitabh Bachchan : बिग बींच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी; देशभरात चार दिवसीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन
National Film Awards 2022 : 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न; विजेत्यांची संपूर्ण यादी...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)