एक्स्प्लोर

Salman Khan : एकदा नव्हे तर तीनदा सापाने दंश केला; सलमान खानने सांगितली घटना

Salman Khan Birthday : अभिनेता सलमान खान याला सापाने एकदा नव्हे तर तीनदा दंश केला. सलमान खानने घडलेली घटना सर्वांना सांगितली.

Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पनवेलच्या फार्म हाऊसवर सापाने दंश केला होता. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात  उपचार करण्यात आले. सलमान खानला एकदा नव्हे तर तीनदा सापाने दंश केला. या घडलेल्या घटनेबाबत सलमान खान याने घडलेल्या घटनेबाबत माध्यमांना सांगितले. 

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सलमान खानने माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सलमान खानने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याने म्हटले, फार्म हाऊसमधील खोलीत सापाने शिरकाव केला. त्यावेळी घरातील लहान मुले प्रचंड घाबरली होती. सापाला बाहेर काढण्यासाठी मी लाकडाची काठी मागितली, ती लहान होती. त्यानंतर लाकडाची मोठी काठी मला देण्यात आली. या काठीच्या आधारे मी सापाला काळजीपूर्वक उचलले आणि घराबाहेर आणले. काठीवर असलेला साप माझ्या हाताच्या दिशेने येत होता. सापाला घराबाहेर नेत असताना मी दुसऱ्या हातात काठी घेतली आणि त्याला घराबाहेर सोडले.

सलमान खानने म्हटले की, तेथे असलेल्या लोकांना आणि स्थानिक ग्रामस्थांना तो साप कंदारी प्रकारचा आहे. मात्र, त्या ठिकाणी होत असलेल्या आरडाओरड, गोंधळामुळे सापाने एकदा नव्हे तर तीनदा दंश केला. त्यानंतर आम्ही रुग्णालयात गेलो. त्या ठिकाणी मला अॅण्टी-वेनम इंजेक्शन देण्यात आले. आतापर्यंत मी सर्व प्रकारचे अॅण्टी-वेनम इंजेक्शन घेतले असल्याचे सलमान खानने म्हटले. 

सलमानने पुढे सांगितले की, सर्पदंशाच्या घटनेनंतर त्याला 6 तास रुग्णालयात ठेवण्यात आले होते, त्यानंतर त्याला घरी येण्याची परवानगी देण्यात आली. साप चावल्यानंतर सलमान खानला नवी मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलमान म्हणाला, हॉस्पिटल सर्व सुविधांनी सुसज्ज होते. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे अँटी व्हेनम उपलब्ध होते." स्थानिक पोलीस आयुक्त बिपिन कुमार आणि आमदार संदीप नाईकदेखील तेथे दाखल झाले. 

सापासोबत सेल्फी

सलमान खानने म्हटले की, सापाने दंश केला तेव्हा बहीण अर्पिता खूपच घाबरली होती. तोपर्यंत माझी आणि सापाची मैत्री झाली होती. त्याच्यासोबत मी सेल्फीदेखील काढला असल्याचे सलमानने हसत-हसत सांगितले. 

सलीम खान यांनी घेतली फिरकी 

सर्पदंशाच्या घटनेनंतर वडील सलीम खान यांच्याशी सलमानचे बोलणे झाले. सलीम खान यांनी सलमान खानची फिरकीच घेतली. सलीम खान यांनी साप जिवंत आहे का, याची विचारणा केली होती. त्यावेळी टायगर ही जिवंत आहे आणि सापदेखील जिवंत असल्याचे सांगितले. सापाला मारले नाही, असेही त्यांनी विचारणा केली. त्यावर मी सापाला प्रेमाने, काळजीपूर्वक सोडून दिले असल्याचे सांगितले. 

हे सेलिब्रेटी होते उपस्थित

सलमान खानने आपला 56 वा वाढदिवस जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत साजरा केला. फार्म हाऊसवर केक कापताना सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता, तिचा पती आयुष शर्मा आणि सलमान खानची कथित गर्लफ्रेंड उलिया वंतूरदेखील उपस्थित होते. 

त्याशिवाय,  हॉलिवूड अभिनेत्री समंथा लॉकवूड, संगीता बिजलानी, बॉबी देओल, जेनेलिया डिसोझा, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा, निर्माता साजिद नाडियादवाला (कुटुंबासह), निर्माता रमेश तौरानी, ​​सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, झहीर इक्बाल, निखिल द्विवेदी (कुटुंबासह) , मनीष पॉल, वत्सल सेठ, माजी काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकी आणि काही निवडक लोक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget