एक्स्प्लोर
वांद्र्याच्या 'गॅलक्सी'तून सलमान खान कुटुंबीय मुक्काम हलवणार?
मुंबई : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांचं त्यांच्या घराशी वेगळं नातं असतं. राजेश खन्ना आणि आशिर्वाद, बिग बी आणि जलसा, शाहरुख खान आणि मन्नत तसंच सलमान खान आणि गॅलक्सी ही काही उदाहरणं. मात्र सलमान खान आणि त्याचं कुटुंबीय लवकरच या इमारतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
खान कुटुंबीय वांद्र्याच्या लिंकिंग रोडवरील लिटल स्टार या इमारतीत शिफ्ट होणार असल्याचं वृत्त आहे. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार सलमानने ही इमारत आपल्या कुटुंबासाठी विकत घेतली आहे. त्यामुळे नव्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट होताच ही मंडळी लिटल स्टारमध्ये वास्तव्यास येतील.
गॅलक्सी या इमारतीतील राहता फ्लॅट विकण्याचा खान कुटुंबाचा कोणताही इरादा नाही. या घराशी भावना आणि अनोखं नातं जोडलं गेल्यामुळे तो खान कुटुंबासोबतच राहील. मात्र राहण्यासाठी त्यांची पसंती नव्या घराला असेल.
गॅलक्सी या इमारतीतील घराने खान कुटुंबाची सुखदुःखात सोबत केली आहे. पडत्या काळातही सावलीसारखी साथ या घराने खानांना दिली. त्यामुळे हा फ्लॅट म्हणजे आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य असल्याची भावना खान मंडळींची आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement