Salman Khan in Singham Again: सिंघममध्ये होणार दबंग एन्ट्री! 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार चुलबुल पांडेच्या भूमिकेत?
Salman Khan in Singham Again:रोहित शेट्टीच्या 'सिंघम' सिनेमात सलमान खानची खास एन्ट्री होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
Salman Khan in Singham Again: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' (Singham Again) यंदाच्या वर्षीत दिवाळीला रिलीज होणार आहे. या सिनेमात अजय देवगन (Ajay Devgan) सह इतरही बरीच स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही या सिनेमासाठी बरेच उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता या स्टारकास्टच्या यादीमध्ये सलमान खानचंही नाव जोडलं असल्याचं म्हटलं जातंय.
'सिंघम अगेन' चित्रपटात सलमान खान 'चुलबुल पांडे'च्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता सिंघममध्ये दबंग एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. आता सिनेमात सलमान खान कोणता ट्विस्ट घेऊन येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
'सिंघम अगेन'मध्ये सलमान खानची एन्ट्री
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अजय देवगणच्या आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये सलमान खानचा कॅमिओ असू शकतो. त्या कॅमिओमध्ये सलमान 'चुलबुल पांडे'ची भूमिका साकारणार असून 'सिंघम'ला सपोर्ट करणार आहे. पण, निर्मात्यांनी अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही आणि आता प्रतीक्षा करावी लागेल.
काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, 'सिंघम या हिरोशिवाय अपूर्ण आहे. या दिवाळीतही स्कॉर्पियो येईल, ती फिरेलही पण एन्ट्री दुसऱ्याचीच होईल. रोहितच्या या व्हिडीओनंतर सलमान खानच्या एन्ट्रीच्या हिंट्स रोहित देत असल्याचं म्हटलं जातंय.
'सिंघम अगेन'ची स्टार कास्ट
या दिवाळीत रिलीज होणाऱ्या 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि जॅकी श्रॉफ महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार इन्स्पेक्टर सूर्यवंशी, रणवीर सिंग इन्स्पेक्टर 'सिंबा'च्या भूमिकेत दिसणार आहे. आता या यादीत सलमान खानचेही नाव जोडले गेले आहे.
View this post on Instagram