Salim-Javed Unknown Facts : सुपरस्टारच्या एका फोनवर मध्यरात्री सलीम-जावेद यांनी बदलली स्क्रिप्ट, काय झालं होतं नेमकं?
Salim-Javed Unknown Facts Haathi Mere Saathi Movie : सलीम-जावेद यांनी एका सुपरस्टारने केलेली सूचना मान्य करत, त्याच्या सांगण्यावरून एका रात्रीत या दोघांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले.
Salim-Javed Unknown Facts : बॉलिवूडमध्ये काही लेखकांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांनी लिहिलेले सिनेमे, संवाद आजही लोकांच्या स्मरणात आहेत. सलीम-जावेद या जोडगोळीने अनेक गाजलेल्या चित्रपटांचे लेखन केले आहे. सलीम-जावेद (Salim-Javed) यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टवर काम करण्यास अनेक स्टार कलाकार उत्सुक असायचे. सलीम-जावेद यांनी एका सुपरस्टारने केलेली सूचना मान्य करत, त्याच्या सांगण्यावरून एका रात्रीत या दोघांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले.
सत्तरच्या दशकात सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार अशी अभिनेते राजेश खन्ना यांची ओळख आहे. राजेश खन्ना यांचे स्टारडम खूपच मोठे होते. निर्माते-दिग्दर्शक त्यांचा प्रत्येक शब्द पाळण्याचा प्रयत्न करायचे. राजेश खन्ना यांनी एकदा चुकून एका चित्रपटासाठी होकार दिला आणि करारावर सही केली. सही केल्यानंतर त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली पण त्यांना काहीच कळले नाही. मग पुढे राजेश खन्ना यांनी केले? हे जाणून घेऊयात...
राजेश खन्नांचा एक फोन अन् स्क्रिप्टमध्ये बदल...
ही गोष्ट 1970 सालची आहे जेव्हा राजेश खन्ना यांनी 'हाथी मेरे साथी' चित्रपटाची स्क्रिप्ट न वाचताच साइन केली होती. काही वर्षांपूर्वी सलीम खान यांनी एका मुलाखतीत या चित्रपटाशी संबंधित गोष्ट सांगितली होती. सलीम खान यांनी सांगितले की, राजेश खन्ना हे असे स्टार होते, ज्यांच्यावर सर्वांचा विश्वास होता. एका रात्री त्यांना फोन आला आणि राजेश खन्ना यांनी जावेद अख्तर यांच्यासह भेटण्यास बोलावले.
एका वृत्तानुसार, सलीम खान यांनी सांगितले की, जेव्हा ते राजेश खन्ना यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, मला पैशांची गरज आहे म्हणून त्यांनी चित्रपट साइन केला. पण आता तो असा प्राण्यांवर आधारित चित्रपट करू शकत नसल्याचे सलीम यांनी सांगितले. त्या बैठकीत सलीम-जावेद यांनी राजेश खन्नांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्राण्यांवर असा चित्रपट अजून बनलेला नाही आणि लोकांना तो आवडेल असे सलीम-जावेद यांनी सांगितले.
त्यानंतर राजेश खन्ना यांनी सलीम-जावेद यांना चित्रपटातील लव्ह स्टोरीचा भाग वाढवण्यास सांगितले. त्यानंतर स्क्रिप्टमध्ये काही थोडे बदल झाले आणि राजेश खन्ना यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी होकार दिला. एका वृत्तानुसार, 1971 मध्ये रिलीज झालेला हाथी मेरे साथी हा त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत होता. बॉक्स ऑफिसवर राजेश खन्ना यांचे सलग आठ चित्रपट रिलीज झाले होते, त्यात 'हाथी मेरे साथी' हा एक चित्रपट होता.
राजेश खन्ना यांना पैशांची गरज का होती?
राजेश खन्ना स्टार होण्यापूर्वी त्यांना समुद्र किनाऱ्यावरील एक बंगला खूपच आवडला होता. हा बंगला 'ज्युबली स्टार' राजेंद्र कुमार यांच्या मालकीचा होता. हा बंगला काही कारणास्तव राजेंद्र कुमार यांना विकायचा होता आणि राजेश खन्ना यांना हा खरेदी करायचा होता. हा बंगला खरेदी करण्यासाठीच राजेश खन्ना यांनी स्क्रिप्ट न वाचता काही चित्रपट साइन केले होते. मात्र, राजेश खन्ना यांच्या सुदैवाने हे सगळेच चित्रपट तिकिटबारीवर कमालीचे यशस्वी ठरले. राजेश खन्ना यांनी तो बंगला खरेदी केला आणि त्याचे नाव 'आशीर्वाद' ठेवले.