एक्स्प्लोर

आयपीएल बेटिंग प्रकरणात आता सलीम खान यांचंही नाव?

आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खानचं नाव आल्यानंतर आता अरबाजचे वडील सलीम खान यांचं नावही समोर आलं आहे.

मुंबई : आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खानने कबुली दिल्यानंतर आता अरबाजचे वडील सलीम खान यांचं नावही समोर आलं आहे. बुकी सोनू जलानने याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे. सलीम खान पूर्वी सट्टा लावत होते, मात्र ते आताही सट्टा लावतात का हे माहित नसल्याचं सोनू जलानने म्हटलं आहे. सोनूने दिलेल्या या माहितीमुळे सलीम खान यांचा आयपीएल बेटिंग प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभिनेता अरबाज खानने आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावणं पसंत नसल्याचंही अरबाज म्हणाला. आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे.

आयपीएल बेटिंग : दिग्दर्शक साजिद खानचाही सहभाग?

अरबाजवर दबाव आणून त्याचे पैसे सोनूने गुंतवल्यामुळे अरबाज थेट आरोपी होत नाही, त्यामुळे अरबाजला बेटिंग प्रकरणात पोलिसांनी मुख्य साक्षीदार केलं.

आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने अरबाजला समन्स बजावलं होतं. ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात झालेल्या चौकशीत अरबाजने ही कबुली दिली.

आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची अरबाज खानची कबुली

चौकशीला जाण्यापूर्वी अरबाज खानने गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन सलमानची भेट घेतली होती. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात अरबाजसोबत सलमानचा बॉडीगार्ड शेरा आणि वकील होते. ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु असलेलं ऑनलाईन बेटिंगचं रॅकेट उघड करत डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड चालवत असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सोनूला बेड्या ठोकल्या. आयपीएल बेटिंग प्रकरणी अरबाज खानला समन्स सोनूच्या चौकशीत अभिनेता अरबाज खान हा देखील सोनूकडे बेटिंग करत असल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी अरबाज खानला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. दरम्यान, सोनूच्या संपर्कात देशातले 80 ते 90 बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या असामींची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Embed widget