एक्स्प्लोर

Salaar trailer Out: "जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए"; प्रभासच्या 'सालार'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Salaar Trailer Out: सालार या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये  जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.

Salaar Trailer Out: अभिनेता प्रभासच्या (Prabhas) सालार (Prabhas) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सालार या चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर आहे. या आधी देखील या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रभासच्या सालार या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये  जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत. तसेच या ट्रेलरमधील श्रुती हसन (Shruti Haasan) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांच्या लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'सालार' च्या ट्रेलरमधील जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स (Salaar Trailer Out)

सालार या चित्रपटाच्या  2.53 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्स बघून तुमच्या अंगावर शहारे येतील. या ट्रेलरमध्ये खानसार नावाच्या जंगलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. "खानसार की कहानी तब बदली जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए" हा डायलॉग सालार या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकू येतो.  ट्रेलरमध्ये प्रभाससोबतच श्रुती हसन आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या देखील झलक बघायला मिळत आहे.

पाहा ट्रेलर:

अभिनेता प्रभासनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सालार चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरची माहिती चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "खानसाराच्या हिंसक जगात प्रवेश करा"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

सेन्सॉरकडून सालारला मिळालं 'A' सर्टिफिकेट

 22 डिसेंबस रोजी प्रभासचा सालार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये  हा चित्रपट रिलीज होणार आहे. सालार पार्ट 1 ला  सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून (CBFC) म्हणजेच सेन्सॉरकडून'A' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा रनटाइम  2 तास आणि 55 मिनिटे एवढा असणार आहे. 

सालार चित्रपटाची स्टार कास्ट (Salaar Movie Star Cast)

सालार या चित्रपटात प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, टिनू आनंद, ईश्वरी राव, जगपती बाबू, श्रिया रेड्डी आणि गरुड राम यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. आता प्रभासचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

Salaar Trailer Twitter Review: "अंगावर शहारे आले"; प्रभासच्या 'सालार' चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांची मनं जिंकली!

 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget