Salaar Advance Booking : प्रभासचा 'सालार' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! 'या' दिवशी सुरू होणार अॅडव्हान्स बुकिंग
Salaar Movie : 'बाहुबली' सुपरस्टार प्रभासची (Prabhas) मुख्य भूमिका असलेला 'सालार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Salaar Advance Booking : वर्षभरात अनेक चांगले सिनेमे प्रदर्शित झाले असून बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. यात बॉलिवूडपटांसह मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांचाही समावेश आहे. 'बाहुबली' सुपरस्टार प्रभासची (Prabhas) मुख्य भूमिका असलेला 'सालार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. लवकरच या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे.
'सालार'च्या अॅडव्हान्स बुकिंगला कधी सुरुवात होणार? (Salaar Advance Booking)
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा हाय-वोल्टेज अॅक्शन थ्रिलर 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'सालार' या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगची घोषणा करण्यात आली आहे. 15 डिसेंबर 2023 पासून 'सालार'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे.
शाहरुख अन् प्रभास आमने-सामने येणार
'सालार' या सिनेमाचं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रभासचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमासोबत 'सालार'ची टक्कर होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर शाहरुख की प्रभासचं वर्चस्व असणार हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
'सालार'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या.. (Salaar Movie Starcast)
'सालार' या सिनेमात सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तो अभिनेत्री श्रूती हासनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. तर जगपती बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारनदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'सालार' हा सिनेमा 'केजीएफ' आणि 'बाहुबली' या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करेल, असे म्हटले जात आहे.
'सालार'च्या ट्रेलरची रेकॉर्डब्रेक कामगिरी
'सालार'च्या ट्रेलरने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. 24 तासांत या सिनेमाला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 24 तासांत या सिनेमाच्या ट्रेलरला 54.2 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. 'सालार' या सिनेमाआधी प्रभासचा सालार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ओम राऊत दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला. पण आता सालारच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रभास सज्ज आहे. या बहुचर्चित सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
'सालार' या चित्रपटामध्ये प्रभाससोबतच पृथ्वीराज सुकुमारन,श्रुती हासन, टिन्नू आनंद, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी आणि रामचंद्र राजू हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. प्रभासचा 'सालार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 'सालार' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली आहे.