Sajid Khan : साजिद खानवर पुन्हा लैंगिक छळाचा आरोप; 'या' मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट
Sajid Khan : साजिद खानवर लैंगिक एका मराठी अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

Sajid Khan : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शिक साजिद खान (Sajid Khan) सध्या भाईजानच्या बिग बॉसमुळे (Bigg Boss) चर्चेत आहे. साजिद बिग बॉसममध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. गेल्या काही दिवसांत साजिदवर गंभीर आरोप केले जात आहेत.
बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉसमधून बाहेर काढण्याचीही मागणी केली गेली. अशातच आता एका मराठी अभिनेत्रीने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता साजिद खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी संपप्त प्रतिक्रिया देत आहेत.
मराठमोळी अभिनेत्री जयश्री गायकवाडने साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली आहे,"आठ वर्षांपूर्वी एका लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शकाने मला एका पार्टीत नेले होते. त्यावेळी सादिज खानशी माझी भेट झाली. त्याला भेटून अर्थात मला आनंद झाला".
View this post on Instagram
जयश्री पुढे म्हणाली,"त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी साजिदने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. तो म्हणाला, तो एक सिनेमा बनवत असून त्यात मी मुख्य भूमिकेत असेन. ऑफिसमध्ये एन्ट्री केल्यापासून साजित मला स्पर्श करत होता. तसेच अश्लील कमेंट करत होता. त्यावेळी साजिद मला म्हणाला, फक्त अभिनय करून चालत नाही. मी सांगतो ते तुला करावं लागेल. त्यावेळी मी रागाने त्याच्या ऑफिसमधून निघून गेले".
दहापेक्षा अधिक अभिनेत्रींनी साजिद खानवर आरोप केले आहेत. यात डिंपल पॉल, अभिनेत्री आहाना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी त्याची एक्स असिस्टंट सलोनी चोप्रा अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 16 : ...या कारणामुळे नेटकरी साजिद खानवर भडकले; म्हणाले... 'मावशी होणं बंद करा..'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
