एक्स्प्लोर

नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मध्ये रिंकू-आकाश!

'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशाची बहुचर्चित जोडी अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नागराज मंजुळे यांचं बॉलिवूड पदार्पण असलेल्या 'झुंड' चित्रपटात दोघं काम करणार आहेत

मुंबई : 'सैराट' चित्रपटातील आर्ची-परशाची जोडी फक्त महाराष्ट्रानेच नाही, तर अवघ्या देशाने डोक्यावर घेतली. ही भूमिका साकारणारे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं बॉलिवूड पदार्पण असलेल्या 'झुंड' चित्रपटात दोघं दिसणार आहेत. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सैराट' चित्रपटाने रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. रिंकू आणि आकाश यांचे असंख्य चाहते निर्माण झाले. मात्र गेल्या अडीच वर्षांत दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी मिळाली नाही. आता, खुद्द नागराज मंजुळेच पुन्हा दोघांना एकत्र आणणार आहेत. यावेळी रिंकू आणि आकाश 'जोडपं' म्हणून एकत्र दिसणार नसल्याचं म्हटलं जातं. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांची भूमिका साकारत आहेत. रिंकू आणि आकाश या संस्थेतील फूटबॉलपटूंच्या भूमिकेत आहेत. आकाश आणि रिंकू यांनी नागपुरात आठवडाभर शूटिंग केल्याची माहिती आहे. यावेळी चित्रिकरण स्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे रिंकू आणि आकाश अत्यंत उत्साहात असल्याचंही सांगितलं जातं. तसंच या सिनेमातून दोघांना बॉलिवूडची दारंही खुली होणार आहेत. सैराटनंतर रिंकू राजगुरुची भूमिका असलेला 'कागर' हा दुसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर आकाश ठोसरने महेश मांजरेकरांच्या 'फ्रेण्डशिप अनलिमिटेड' सिनेमात झळकला होता. तर नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजमध्ये राधिका आपटेसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान
Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान
निकोलस पूरनचं वादळ, लखनौचं मुंबईसमोर 215 धावांचे विराट आव्हान
निकोलस पूरनचं वादळ, लखनौचं मुंबईसमोर 215 धावांचे विराट आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharmila Thackeray : बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, राज ठाकरेंच्या भाषणावर पत्नीची प्रतिक्रियाPM Modi at Shivajipark : फुलं वाहिली, वाकून नमस्कार केला, बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी मोदी नतमस्तकSanjay Raut Full Speech : मोदीजी आप तो गयो! महाराष्ट्राशी पंगा महागात पडणार : संजय राऊतNarendra Modi Meet : राज ठाकरे, तटकरे, कदम....सभेनंतर मोदी कुणा-कुणाला भेटले? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान
Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान
निकोलस पूरनचं वादळ, लखनौचं मुंबईसमोर 215 धावांचे विराट आव्हान
निकोलस पूरनचं वादळ, लखनौचं मुंबईसमोर 215 धावांचे विराट आव्हान
Uddhav Thackeray Speech : घराणेशाही ते मराठी-गुजराती , उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
घराणेशाही ते मराठी-गुजराती , उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
जनतेने गोडसेंना निवडले, त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले; मी मंत्री झालो : नितीन गडकरी
जनतेने गोडसेंना निवडले, त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले; मी मंत्री झालो : नितीन गडकरी
मोठी बातमी : गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह, BCCI ची विनंती मान्य होणार?
मोठी बातमी : गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह, BCCI ची विनंती मान्य होणार?
Sharad Pawar: हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही;  शरद पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar: हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget