एक्स्प्लोर
सिनेमा पाहिला, नेटवर अर्थ शोधला... अन् मुलाचं नाव ठेवलं 'सैराट'
बेळगाव: नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आहे. सध्या बेळगावसह सीमाभागात देखील 'सैराट'चाच बोलबाला आहे. हा सिनेमा सीमाभागातील रसिकांच्याही पसंतीस उतरला आहे. याचंच खास उदाहरण म्हणजे बेळगावमधील एका जोडप्यानं चक्क आपल्या मुलाचंच नाव 'सैराट' ठेवलं आहे.
बेळगाव गांधीनगर येथे राहणाऱ्या नागेश मंडोळकर आणि दीपाली मंडोळकर यांनी आपल्या मुलाचं नामकरण 'सैराट' असं केलं आहे. मनोहर यांनी आणि त्यांच्या पत्नीने 'सैराट' सिनेमा पहिला आणि त्यांना तो प्रचंड आवडला.
त्यानंतर दोघांनीही सैराट शब्दाचा अर्थ नेटवरून शोधून काढला आणि त्यांना हे मराठी नाव फारच आवडलं. हे नावं दोघांनं एवढं भावलं की, त्यांनी थेट आपल्या मुलाचं नावचं सैराट ठेवलं. या शब्दाचा अर्थ उमगल्यामुळेच आपण मुलाचं नाव सैराट ठेवल्याचे मंडोळकर पती पत्नींनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement