एक्स्प्लोर
Advertisement
'सैराट'ला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या 'सैराट' चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जर्मनीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही 'सैराट'ला पुरस्कार मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय सिनेवर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जर्मनीतील लुकास चित्रपट महोत्सवात सैराटनं दोन पुरस्कार पटकावले आहेत. 'ऑडियन्स चॉईस' अर्थात प्रेक्षकांच्या पसंतीचा आणि 'स्पेशल मेन्शन' अर्थात 'विशेष उल्लेखनीय' अशा दोन पुरस्कारांवर नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटानं मोहोर उमटवली आहे.
जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे पार पडलेल्या सोहळ्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी बजावली आहे. आर्ची आणि परशाची भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement