एक्स्प्लोर
Advertisement
झिंगाट, सैराट, आर्ची-परशा कळले, पण प्रबोधन झालं नाही : नागराज मंजुळे
पिंपरी चिंचवड : 'सैराट' सिनेमाने लोकांच्या मनावर अधिराज्य जरी गाजवलं असलं, तरी सैराट लोकाचं प्रबोधन करु शकला नाही, असं मत सिनेमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने व्यक्त केलं आहे.
पिंपरी-चिंचवडमधील नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत नागराज मुंजळे बोलत होता.
लोकांना झिंगाट कळलं, सैराट कळलं, आर्ची, परशा, 100 कोटी कळलं, मात्र प्रबोधन झालंच नाही, अशा शब्दात नागराज मंजुळे यांनी भावना व्यक्त केल्या. चित्रपटातून समाज प्रबोधन करणं आव्हानात्मक असल्याचं नागराज म्हणाला.
नागराज म्हणाला की, "ऑनर किलिंग हा जो काही प्रकार आहे तो मुकर्ररपणे तयार होतो. कुणी कोणाला मारु नये, हिंसा करु नये, हे किमान एवढं तरी बेसिक त्यातनं कळायला पाहिजे होतं. ते न कळता झिंगाट कळलं, सैराट कळलं, आर्ची कळली, परशा कळला, 100 कोटी कळले, सगळं जग कळतं. पण प्रबोधनाचं कधी कधी मला खूप गंमत वाटते, प्रबोधन खरंच होऊ शकतं का? एवढा मोठा पिक्चर करायचा आणि परत हे सांगायचं याचं हसू येतं मला. मग पिक्चर कशाला करायचा असं सांगायला पाहिजे होतं. म्हणून प्रबोधन खूप वेगळं आहे आणि पिक्चर वेगळा आहे."
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement