एक्स्प्लोर
कडेकोट सुरक्षेत रिंकू राजगुरु पहिल्यांदाच अकलूजमध्ये!

अकलूज (सोलापूर) : सैराट चित्रपटाच्या प्रदर्शानंतर पहिल्यांदाच अकलूजमध्ये आलेल्या रिंकू राजगुरूचं जोरदार स्वागत झालं. अकलूज ग्रामस्थांच्या वतीनं रिंकूसह राष्ट्रपती पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने आणि अकलूजच्या इतर 12 कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
अकलूजकरांकडून सत्कार ग्रामस्थांकडून सत्कार घेण्यासाठी रिंकू राजगुरु देखील अकलूजमध्ये पोचली खरी, मात्र चाहत्यांच्या अलोट उत्साहामुळे तिला बाहेर पडणेच अवघड बनले होते.
अकलूजची शाळकरी रिंकू ते सैराटची आर्ची अकलूज येथील चित्रपट क्षेत्रातील उज्वल परंपरा राखताना रिंकू हिने अकलूज वासियांचे नाव मोठे केल्याचे सांगत, तिला महाराष्ट्रीयन फेटा बांधून तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधताना ‘अकलूजची शाळकरी रिंकू ते सैराटची आर्ची’ हा प्रवास उलगडून सांगितला.
मला डॉक्टर व्हायचंय – रिंकू “आता हे दहावीचे वर्ष असून, मी पुस्तके अभ्यासाला आणली आहेत. आता मला शिक्षणाकडे लक्ष द्यायचे असून, एखादा सिनेमा मिळाला तरी करेन पण मला डॉक्टर बनायचे आहे.” असे रिंकूने सांगितले.
पाहा आणखी फोटो : रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा 'झिंगाट'
‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर रिंकू पहिल्यांदाच अकलूजमध्ये! ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर स्टार झालेली रिंकू पहिल्यांदाच अकलूजमध्ये आली. पण तिची एक झलक पाहायला हजारो चाहते तिला शोधत फिरत होते.
अकलूजकरांकडून सत्कार ग्रामस्थांकडून सत्कार घेण्यासाठी रिंकू राजगुरु देखील अकलूजमध्ये पोचली खरी, मात्र चाहत्यांच्या अलोट उत्साहामुळे तिला बाहेर पडणेच अवघड बनले होते. पाहा आणखी फोटो : रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा 'झिंगाट'
चाहत्यांची तुफान गर्दी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडीतून संध्याकाळी 6 वाजता सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात रिंकू कुटुंबासह स्मृती भवनमध्ये पोचली. पण बाहेर येताच स्मृती भवनच्या बाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली. या चाहत्यांसाठी बाहेर स्क्रीन लावण्यात आला होता. यावर रिंकूचे शूटींग मोबाईलवर करून हे चाहते समाधान करून घेत होते.
अकलूजची शाळकरी रिंकू ते सैराटची आर्ची अकलूज येथील चित्रपट क्षेत्रातील उज्वल परंपरा राखताना रिंकू हिने अकलूज वासियांचे नाव मोठे केल्याचे सांगत, तिला महाराष्ट्रीयन फेटा बांधून तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधताना ‘अकलूजची शाळकरी रिंकू ते सैराटची आर्ची’ हा प्रवास उलगडून सांगितला. पाहा आणखी फोटो : रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा 'झिंगाट'
गावकऱ्यांसाठी खास डायलॉग यावेळी सैराटमधील संवाद सादर करुन गावकऱ्यांची इच्छा देखील तिने पूर्ण केली. कार्यक्रम सुरु असतानाच तिला अचानक मुंबईला जाण्याचा फोन आल्याने तिला कार्यक्रम अर्धवट सोडूनच निघावे लागले.
मला डॉक्टर व्हायचंय – रिंकू “आता हे दहावीचे वर्ष असून, मी पुस्तके अभ्यासाला आणली आहेत. आता मला शिक्षणाकडे लक्ष द्यायचे असून, एखादा सिनेमा मिळाला तरी करेन पण मला डॉक्टर बनायचे आहे.” असे रिंकूने सांगितले. पाहा आणखी फोटो : रिंकूला पाहण्यासाठी अकलूजमध्ये चाहत्यांचा 'झिंगाट'
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
अमरावती























