एक्स्प्लोर

#MeToo : 25 वर्षांपूर्वी मलाही त्रास दिलेला : सैफ अली खान

'बेखुदी' सिनेमाच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्यूल झाल्यानंतर सैफ 'अनप्रोफेशनल' वागत असल्याचं सांगत दिग्दर्शक राहुल रवैल यांनी त्याला काढलं होतं.

मुंबई : करिअरच्या सुरुवातीला मलाही त्रास दिला गेला होता, तो लैंगिक छळ नसला तरी 25 वर्षांपूर्वी झालेल्या जाचामुळे मी अजूनही संतप्त आहे, असं प्रख्यात अभिनेता सैफ अली खानने सांगितलं. इतरांच्या वेदना लोकांना समजतच नसल्याची खंत सैफने व्यक्त केली. 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने आपला #MeToo अनुभव शेअर केला. 'मला त्याविषयी फार काही बोलायचं नाही, कारण आजही मी तितका महत्त्वाचा नाही. माझ्यासोबत काय झालं होतं, ते आठवलं तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. सध्या जे सुरु आहे, ते चांगलं आहे. लोकांना न्याय हवा आहे. बदल घडतोय, ही सकारात्मक बाब आहे' असंही सैफ म्हणाला. 1991 मध्ये दिग्दर्शक राहुल रवैल यांनी सैफला बेखुदी (1992) चित्रपटासाठी साईन केलं होतं. चित्रीकरणाचं पहिलं शेड्यूल झाल्यानंतर सैफ 'अनप्रोफेशनल' वागत असल्याचं सांगत त्याला रवैल यांनी काढलं. सिनेमात नवोदित काजोलच्या जोडीला कमल सदानाची वर्णी लागली. 1993 मध्ये यश चोप्रा यांच्या 'परंपरा' चित्रपटातून सैफने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बेखुदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सैफची भेट अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाली. दोघं ऑक्टोबर 1991 मध्ये विवाहबंधनात अडकले. मात्र 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. साजिद खानने 'हमशकल्स' चित्रपटाच्या सेटवर महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्याचं आठवत नाही, असं सैफ म्हणाला. 'जर माझ्यासमोर असं काही घडलं असतं, तर मलाच ते पसंत पडलं नसतं. महिलांना तुच्छ वागणूक मिळणाऱ्या वातावरणातच मला रहायची इच्छा होत नाही.' असंही सैफने सांगितलं. #MeToo चं वादळ अभिनेत्री तनुश्री दत्ता ने नाना पाटेकरांविरोधात आरोप केल्यानंतर #MeToo या चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांनी 20 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप 'तारा' मालिकेच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी केला. कंगना रनौत, सोना मोहापात्रा, हिमानी शिवपुरी, सिमरन कौर सुरी, संध्या मृदुल, पूजा भट्ट, फ्लोरा सैनी, ज्वाला गुट्टा यांनीही आपली आपबिती मीडियासमोर सांगितली होती. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, संस्कारी बाबूजी अलोकनाथ, गायक कैलाश खेर, सुभाष घई यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. अगदी कॉमेडियन अदिती मित्तलवरही महिला कॉमेडियनने गैरवर्तनाचे आरोप केले. #MeToo चं वादळ त्यानंतर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातही दाखल झालं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर पत्रकार प्रिया रमानी यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. तर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला. संबंधित बातम्या :
#MeToo : मेघना गुलजार, जोया अख्तरसह 11 दिग्दर्शकांचा मोठा निर्णय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget