एक्स्प्लोर

ड्रग कनेक्शनमध्ये चौकशीनंतर सारापासून अंतर ठेवल्याच्या वृत्तावर सैफचं स्पष्टीकरण

एनसीबीने ड्रग्ज कनेक्शनमध्ये साराची चौकशी केल्यानंतर या प्रकरणापासून अंतर ठेवण्यासाठी सैफ अली खान पत्नी करीना आणि मुलगा तैमूरसह दिल्लीला गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र यावर आता सैफने प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची चौकशी झाली. यामध्ये सारा अली खानचाही समावेश आहे. एनसीबीच्या समन्सनंतर सारा अली खान गोव्याहून मुंबईला आली होती. आपण ड्रग्जचं सेवन केलं नाही असा दावा साराने चौकशीदरम्यान केला. एनसीबीने साराची चौकशी केल्यानंतर या प्रकरणापासून अंतर ठेवण्यासाठी सैफ अली खान पत्नी करीना आणि मुलगा तैमूरसह दिल्लीला गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र यावर आता सैफने प्रतिक्रिया दिली आहे.

एका वेबसाईटशी बोलताना सैफ म्हणाला की, "मी माझ्या तिन्ही मुलांवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या पाठिशी कायम असेन." हे खरं आहे की मी जास्त वेळ तैमूरसोबत व्यतीत करतो. पण सारा आणि इब्राहिम यांच्याही कायम संपर्कात असतो. तिन्ही मुलांसाठी माझ्या मनात एक वेगळं स्थान आहे.

ड्रग्ज कनेक्शनमध्ये साराची चौकशी झाल्याच्या मुद्द्यावर सैफ अली खान म्हणाला की, जर मी सारावर एखाद्या गोष्टीवरुन नाराज असेन तर यात दिलासा देण्यासाठी तैमूर काही करु शकत नाही. माझी तिन्ही मुलं वेगवेगळ्या वयाची आहे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्शनची गरज आहे. मी फोन किंवा चॅटवर सारा आणि इब्राहिमशी बोलू शकतो. पण हे मी तैमूरसोबत करु शकत नाही. त्यासाठी मी तैमूरला जास्त वेळ देत आहे.

ड्रग कनेक्शन प्रकरणात नाव समोर आल्यानंतर एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीतची चौकशी केली होती. चौकशीत साराने सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, असं सांगितलं होतं. त्यावेळी आपण त्याच्या फार्महाऊसवर जायचो, असंही म्हटलं होतं. मात्र ड्रग्जचं कधीही सेवन केलं नाही, असा दावाही तिने केला आहे.

...म्हणून सैफ अली खान दिल्लीत गेला! सैफ अली खान चौथ्यांदा बाबा बनणार आहे. त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान लवकर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. करीना आणि सैफ तैमूरसह सध्या दिल्लीत आहे. करीना प्रेग्नन्सीदरम्यानही आमीर खानसोबत 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाचं दिल्लीतील चित्रीकरण 45 दिवसांचं आहे.

Bollywood drug probe | सुशांतशी कसा संबंध आला? सारा काय म्हणाली...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget