एक्स्प्लोर
करिनाच्या घरी कुणी तरी येणार येणार गं, सैफची घोषणा

मुंबई : बॉलिवूडची लाडकी बेबो करिना कपूरच्या प्रेग्नन्सीबाबत अनेक वेळा अफवा उठताना दिसतात. सैफ आणि करिना यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या बातम्यांना ऊत आला असताना खुद्द बॉलिवूडचा नवाब सैफ अली खाननेच याबाबत खुलासा केला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत आम्ही आई-बाबा होऊ, असं सैफ अली खानने जाहीर केलं आहे. सैफ अली खानने एक पत्रक प्रसिद्ध करुन याबाबतची घोषणा केली. "मला आणि माझी बायको करिनाला आनंद होतोय की, येत्या डिसेंबरपर्यंत आमच्या कुशीत पहिलं बाळ असेल. आमच्यासाठी ही गेल्या काही दिवसातील सर्वात आनंदाची बातमी आहे", असं सैफ म्हणाला. सध्या करिना कामातून ब्रेक घेणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सिनेमासाठी बराच वेळ पाहावा लागणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग























