एक्स्प्लोर

'तो' एक फोन कॉल ठरला टर्निंग पॉईंट; पोलिसांनी ठाण्यात लपून बसलेल्या सैफच्या हल्लेखोराला कसं शोधलं?

Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Saif Ali Khan Case Update : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. घटनेच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. चोरीच्या प्रयत्नात सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या आरोपीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन त्याला जखमी करुन तिथून पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी अथक प्रयत्नांनी आरोपीला कशाप्रकारे अटक केली ते जाणून घ्या.

'तो' एक फोन कॉल ठरला तपासाचा टर्निंग पॉईंट

सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीने वांद्रेतील निवासस्थानावरुन पळ काढला. त्यानंतर 8 वाजता आरोपी दादरला गेला, त्यानंतर तो वांद्रेला पोहोचला. त्यानंतर तो सेंट्रल लाईनच्या दिशेने जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी सेंट्रल भागातून आरोपीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ठाणे दाखवलं.

घटनेपूर्वीच्या 10 ते 15 दिवसांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं

आरोपीचा शोध घेण्यासाठी, मुंबई पोलिसांनी केवळ घटनेच्या दिवसांचं नाही, तर घटनेपूर्वीच्या 10 ते 15 दिवसांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज देखील स्कॅन केले. या फुटेजच्या स्कॅनिंग दरम्यान, डीएन नगर परिसरातील एक फुटेजमध्ये अंधेरीतील एका व्यक्ती दिसली. मुंबई पोलिसांना एक सीसीटीव्ही मिळाला, ज्यामध्ये एक बाईकस्वार डीएन नगर परिसरात एका व्यक्तीला खाली सोडत आहे. बारकाईने विश्लेषण केल्यावर असे आढळून आलं की, बाईकवरून खाली उतरणारा व्यक्ती सैफ अली खानचा हल्लेखोर आहे. त्यानंतर बाईकच्या नंबरची माहिती काढण्यात आली आणि पोलिसांना एकामागून एक लीड मिळू लागले.

पोलिसांनी लपून बसलेल्या हल्लेखोराला कसं शोधलं?

सुरुवातीच्या तपासात आरोपीकडे मोबाईल फोन नाही, असं वाटत होतं. कारण त्याचा मोबाईल नंबर सापडत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री सापडलेल्या फुटेजमध्ये आरोपी फोनवर बोलताना दिसला. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी फोनवर बोलतो आणि पुढे जातो. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळी त्या भागात असलेला मोबाईल फोनचा डेटा काढला. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्यावेळी जास्त लोक फोन कॉल करत नसल्याने त्याचा मोबाईल नंबर शोधणं पोलिसांसाठी सोपं झालं. 

लेबर कॅम्पमधून आरोपीला अटक

सैफच्या घरातूल बाहेर पडल्यावर आरोपीचं कुणासोबत तरी फोनवर संभाषण झालं, त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि सकाळी दादर रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर फोन चालू केला आणि कॉल केला. त्यानंतर पुन्हा आरोपीने फोन बंद केला. यावेळी त्याची लोकेशन ठाणे होती. त्यानंतर पोलिसांनी ठाण्याच्या कासारवडवलीतील लेबर कॅम्पला घेराव घालून आरोपीला पकडलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ब्रेकिंग! सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी? नामांकित कंपनीत नोकरीला

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget