एक्स्प्लोर

'शाहू' साकारताना अभिनेत्याचा रंगमंचावरच मृत्यू

पुणे : रंगमंचावर नाट्यप्रयोग सादर करत असतानाच अभिनेता सागर चौगुले याचा मृत्यू झाला आहे. ‘अग्निदिव्य’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने सागरने टिळक स्मारक रंगमंदिरातील रंगमाचवर अखेरचा श्वास घेतला. शाहू महाराजांच्या जीवनावर अधारित ‘अग्निदव्य’ या नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच 38 वर्षीय सागर शांताराम चौगुले याचा मृत्यू झाला.  सागरच्या मागे आई, एक भाऊ, वहिनी, पत्नी आणि दिड वर्षांची मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा तो सख्खा भाचा होता. आज पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होती. कोल्हापूरचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला होता. आज हा संघ 40 कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ हे शाहू महाराजांच्या जीवनावरील नाटक सादर करत होता. नाटकाच्या सुरवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमीकेत असलेल्या सागर चौगुले यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवीली होती. मात्र, नाटकाचा मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणताना सागरला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने सागरला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुणा हॉस्पिटलला हलविण्यात आले. पुना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सागर हा मूळचा कोल्हापूरचा असून चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचा मुलगा आहे. सागरचा कोल्हापूरमध्ये जहिरात क्षेत्राशी निगडीत व्यावसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन वयापासूनच तो नाटकांमध्ये भाग घेत होता. राज्य नाट्य स्पर्धेपूर्वीच सहा महिन्यांपूर्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविले होते. या नाटकात त्याने केलेल्या शाहू महाराजांच्या भूमीकेस सर्वच स्थरांतून वाहवा मिळत होती. आजही पुण्यात नाटक सादर करताना त्याने सर्वच रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. सागरने नाटकाबरोबर काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच त्याचा ‘सासू आली अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य
Ramayana Trailer Gets U Certificate: 4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
4000 कोटींच्या 'रामायण'बाबत मेकर्सचा मोठा निर्णय; दोन ट्रेलर रिलीज होणार, सेंसर बोर्डाकडून मिळालं U सर्टिफिकेट
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget