एक्स्प्लोर
VIDEO: सचिनच्या सिनेमाचा टिझर रिलीज

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. सचिन तेंडुलकरनेच ट्विटरवर टिझर रिलीज केलं आहे. यापूर्वी सचिननेच पोस्टर रिलीज केलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील ‘200 नॉट आऊट’ या प्रॉडक्शन कंपनीनं हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे. 14 एप्रिलला दुपारी एक वाजता या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला जाईल, असं सचिनने सांगितलं होतं. त्यानुसार सचिनने बरोबर 1 वा. टिझर रिलीज केला आहे. या टिझरमध्ये - मेरे बाबा मुझे हमेशा कहते थे, तुमने जिंदगी में क्रिकेट को चुना है ए एक बात है, लेकीन आखिर तक जो बात तुम्हारे साथ रहेगी वो ए होगी की तुम इन्सान कैसे होगे, हा डायलॉग ऐकायलो मिळतो.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र























