एक्स्प्लोर

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचं दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने स्पष्ट केलं आहे.

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचं दिग्दर्शक एस.एस. राजामौलीने स्पष्ट केलं आहे. तसेच कथानकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आणि आणि पुरस्कार मिळवण्याऐवजी टीमसाठी पैसे कमावणं हा आपला मुख्य उद्देश असल्याचं त्यानं यावेळी सांगितलं. ऑस्कर नामांकनाबद्दल राजामौली म्हणतो की, “ऑस्करच्या शर्यतीत बाहुबलीला नामांकन न मिळाल्याने मी नाराज नाही. जेव्हा मी सिनेमा बनवतो, तेव्हा कधीही पुरस्काराबद्दल विचार करत नाही. एखादी कथा मला आवडली, तर ती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा माझा मुख्य उद्देश असतो. तसेच सिनेमाच्या निर्मितीत ज्यांनी स्वत: ला झोकून दिलं, त्यांच्यासाठी पैसे कमावणं हे माझं लक्ष्य असतं.” तो पुढे म्हणाले की, “जर एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा मला नक्कीच आनंद होतो. पण जर नाही मिळाला, तर मी त्यावर शोक व्यक्त करत बसत नाही. कारण ते माझ्या तत्वात बसत नाही.” मराठमोळा दिग्दर्शक अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ सिनेमाला नुकतंच ऑस्करचं नामांकन मिळालं. पण ऑस्करच्या शर्यतीत यापूर्वी ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ हा सिनेमा असल्याची जोरदार चर्चा होती. राजामौलीच्या 'बाहुबली 2' सिनेमाने जगभरात चांगली कमाई केली. या सिनेमाने तब्बल 1000 कोटीपेक्षा अधिकची कमाई करुन, भारतीय बॉक्स ऑफिसवरील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. सिनेमा हिट होणार याची पूर्वकल्पना असल्याचे सांगत, उत्तर भारतातही या सिनेमाने तुफान कमाई केल्याचं अश्चर्य वाटत असल्याचंही राजामौलीने यावेळी सांगितलं. सिनेमाच्या बजेटबद्दल राजामौली म्हणाला की, “या दोन्ही सिनेमांचं (बाहुबली 1 आणि बाहुबली 2) बजेट एकूण 150 कोटी रुपये होतं. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला नक्की उतरेल, याचा विश्वास असल्याने, आम्ही या सिनेमा निर्मितीचं काम सुरु केलं.”

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget