एक्स्प्लोर

S P Balasubrahmanyam Death Anniversary : ‘हम बने तुम बने’ ते ‘वाह वाह रामजी’, एस. पी. बालासुब्रमण्यम यांची सुप्रसिद्ध गाणी!

S P Balasubrahmanyam : एस.पी बालासुब्रमण्यम यांनी आपल्या आवाजाने साऊथच नव्हे, तर बॉलिवूड विश्वाला देखील मोहिनी घातली.

S P Balasubrahmanyam : साऊथ अभिनेता कमल हासनच्या ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटाने गायक-संगीतकार एस. पी. बालासुब्रमण्यम (S P Balasubrahmanyam) यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक हक्काचे स्थान मिळवून दिले. एस.पी बालासुब्रमण्यम यांच्या आवाजातले ‘हम बने तुम बने एक दुजे के लिये’ हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले होते. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा पहिला चित्रपट ‘मैने प्यार किया’साठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली होती. सलमानचा चित्रपट हिट झाला आणि एस.पी. बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली. यानंतर एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी सलमानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली. केवळ सलमानच नव्हे तर, अनेकांसाठी त्यांनी गाणी गायली.

एस. पी. बालासुब्रमण्यम यांना इंजिनीअर बनायचे होते. मात्र, गायन-संगीत क्षेत्राकडे वळणे हेच कदाचित त्यांचे प्राक्तन असावे. इंजिनीअर बनण्यासाठी सुरु झालेला हा प्रवास बदलत्या परिस्थितीमुळे हळूहळू संगीताकडे वळू लागला. सुरुवातीला त्यांनी मोठ्या संगीतकारांकडे सहायक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी एकट्यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने साऊथच नव्हे तर बॉलिवूड विश्वाला देखील मोहिनी घातली. त्यांची गाणी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.

पहला पहला प्यार

‘हम आपके है कौन’ या चित्रपटातील हे सुपरहिट गाणे एसपी बालासुब्रमण्यम यांनी गायलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याचे बोल देव कोहली यांनी लिहिले असून, संगीत राम लक्ष्मण यांचे आहे. सूरज आर बडजात्याचा चित्रपट ‘हम आपके है कौन’ 1994मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यात सलमान खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत झळकले होते.

वाह वाह रामजी

‘हम आपके है कौन’ याच चित्रपटामधलं आणखी एक गाजलेलं गाणं. एसपी बालासुब्रमण्यम यांनी गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत हे गाणे गायले होते. आजही या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. या चित्रपटातून एसपी बालासुब्रमण्यम यांना सलमान खान याचा आवाज लोकप्रियता मिळाली होती.

देखा है पहली बार

‘साजन’ चित्रपटातील ‘देखा है पहली बार’ हे गाणे एसपी बालासुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांनी गायले होते. त्या काळातील हे सर्वात रोमँटिक गाणे म्हणून चर्चेत होते. ‘साजन’ या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित, सलमान खान आणि कादर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

मेरे रंग मे रंगनेवाली

सलमान खान आणि भाग्यश्री यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने रसिक श्रोत्यांच्या मनावर गारुड केलं होतं. यानंतर अनेक कलाकारांनी या आयकॉनिक रोमँटिक गाण्यावर स्वतःचे व्हर्जन आणले. पण, कुणीही या मूळ गाण्याला मात देऊ शकले नाही. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील हे गाणे देव कोहली यांनी लिहिले होते.

हम बने तुम बने

‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातील ‘हम बने तुम बने’ हे गाणे एसपी बालासुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांचे आणखी एक हिट गाणे ठरले. ‘हम बने तुम बने’ हे गाणे आनंद बक्ष यांनी लिहिले होते.

हेही वाचा :

S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary : ‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही कोरले नाव! वाचा एस. पी. बालासुब्रमण्यमबद्दल...

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget