Jawan : शाहरुख खानसोबत राम चरण शेअर करणार स्क्रिन? चर्चेला उधाण
राम चरण (Ram Charan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे लवकरच स्क्रिन शेअर करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.
![Jawan : शाहरुख खानसोबत राम चरण शेअर करणार स्क्रिन? चर्चेला उधाण RRR Fame Ram Charan to Join Shah Rukh Khan in Jawan Jawan : शाहरुख खानसोबत राम चरण शेअर करणार स्क्रिन? चर्चेला उधाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/07/fb9fde7aa3bf25c13d3ed075e5454ec21678181382232259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jawan : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे लवकरच स्क्रिन शेअर करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, राम चरण हा शाहरुखच्या जवान (Jawan) या आगामी चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहे.
जवान या शाहरुखच्या आगामी चित्रपटामध्ये राम चरण छोटी पण महत्वाची भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे. जवान या चित्रपटामध्ये राम चरण आणि शाहरुख पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत, अशी चर्चा आहे. जवान चित्रपटाच्या मेकर्सनं सुरुवातीला या चित्रपटामधील कॅमिओ रोलची ऑफर थलापती विजय आणि अल्लू अर्जुन यांना देण्यात आली होती. पण दोन्ही अभिनेत्यांनी ही ऑफर नाकारली. अल्लू अर्जुन हा सध्या पुष्पा-2 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खान हा देखील जवान या चित्रपटामध्ये छोटी भूमिका साकारणार आहे.
'हे' कलाकार साकारणार मुख्य भूमिका
जवान हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. शाहरुख खानचा या चित्रपटात डबल रोल आहे. चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. जवान या चित्रपटाचं शूटिंग पुणे, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये झालं आहे. चित्रपटाच्या काही भागाचं शूटिंग लवकरच होणार आहे.
जवान कधी रिलीज होणार?
जवान या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. शाहरुखचा पठाण हा 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला. आता त्याचा जवान हा त्याचा चित्रपट 2 जून 2023 रोजी रिलीज होणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Jawan : शाहरुखच्या 'जवान' चित्रपटासाठी विजय सेतुपतीनं घेतलं एवढं मानधन; आकडा ऐकून व्हाल अवाक्!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)