एक्स्प्लोर
दाऊदसोबत 1988 मध्ये चहा घेत 4 तास चर्चा : ऋषी कपूर
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतच्या एका भेटीचा अभिनेता ऋषी कपूर यांनी खुलासा केला आहे. 1988 मध्ये दुबईत एका कार्यक्रमासाठी गेलो असताना दाऊदशी भेट झाली आणि 4 तास चर्चा झाल्याचा खुलासा ऋषी कपूर यांनी केलाय.
'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांनी दाऊद इब्राहिम सोबतच्या भेटीवर खुलासा केलाय.
दुबईच्या विमानतळावर उतरल्यावर एक अनोळखी व्यक्ती माझ्याकडे आला आणि दाऊदशी बोलणार का असं विचारलं?, त्यानंतर दाऊदने घरी येण्याचंही निमंत्रण दिल्याचं ऋषी कपूर यांनी आत्मचरित्रात लिहिलंय.
जवळपास 4 तास चहा आणि बिस्कीटच्या सत्रात दाऊदने केलेल्या अपराधांचीही माहिती दिली. मात्र त्याला त्यावेळी कोणताही पश्चात्ताप वाटत नव्हता, असंही ऋषी कपूर यांनी पुस्तकात लिहिलंय.
1993 बॉम्बस्फोटापूर्वीची ही भेट आहे असून त्यावेळी दाऊद फरार नव्हता किंवा महाराष्ट्राचा दुश्मन नव्हता. म्हणून भेटीत कसलाही संकोच वाटला नाही, असं ऋषी कपूर यांनी आत्मचरित्रात लिहिलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement