एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिकचा ब्रँड अॅम्बेसेडर सलमानला दीपा कर्माकरचं नावच आठवेना!
मुंबईः बॉलिवूड अभिनेता आणि रिओ ऑलिम्पिकचा ब्रँड अॅम्बेसेडर सलमान खान चक्क भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं नावच विसरला. खेळाडूंविषयी कार्यक्रमात सलमानला प्रश्न विचारण्यात आला, त्याला जिम्नॅस्ट खेळाडूबद्दल बोलायचं होतं, मात्र त्याच्यावर ही लाजीरवाणी नामुष्की ओढावली.
सलमान खान रिओ ऑलिम्पीकचा ब्रँड अम्बेसेडर आहे.खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहीत करणं सलमानचं काम आहे. मात्र अॅम्बेसेडरच खेळाडूंचे नाव विसरला तर कसं होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं फायनल गाठून नवा इतिहास घडवला आहे. दीपा कर्माकरनं व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करुन आठवं स्थान मिळवलं आणि फायनलमधील आपलं स्थानही पक्क केलं. 22 वर्षीय दीपा ऑलिम्पिक गाठणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे.
संबंधित बातमीः रिओ ऑलिम्पिक : भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची फायनलमध्ये धडक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement