News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

रिंकू राजगुरुच्या 'कागर' चित्रपटाचा टीझर लाँच

कागरच्या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात रिंकूची भूमिका काय असेल, याबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : 'सैराट' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आगामी चित्रपट 'कागर'चा टीझर लाँच झाला आहे. या चित्रपटात रिंकूसोबत अभिनेता शुभांकर तावडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. कागरच्या टीझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात रिंकूची भूमिका काय असेल, याबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सैराटमधील आर्ची फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात लोकप्रिय झाली होती. त्यानंतर रिंकूनचे 'सैराट'च्या कन्नड व्हर्जनमध्ये भूमिका केली, मात्र मराठीतला हा तिचा दुसराच सिनेमा आहे. कागर चित्रपटात शशांक शेंड्ये, भारती पाटील यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मकरंद माने यांच्या खांद्यावर आहे. कागर येत्या 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. टीझर पाहता हा सैराटप्रमाणेच प्रेमकथा आणि राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट वाटतो.
...म्हणून रिंकूच्या 'कागर'साठी आणखी वाट पाहावी लागणार!
हा सिनेमा 14 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार होता. मात्र रिंकूच्या बारावीच्या परीक्षेमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यातच 26 तारखेला 'मार्व्हल : अॅव्हेंजर एंडगेम' हा चित्रपटही प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. VIDEO | कागर चित्रपटाचा टीझर पाहा
Published at : 01 Apr 2019 11:57 PM (IST) Tags: Rinku Rajguru Marathi breaking news ABP Majha Latest Updates Marathi live News latest news Marathi News Maharashtra

आणखी महत्वाच्या बातम्या

'वेड' फेम अभिनेत्री उरकणार साखरपुडा? 'मिस्ट्री मॅन' सोबतचा फोटो शेअर, कॅप्शनमधून  सगळंच सांगून टाकलं

'वेड' फेम अभिनेत्री उरकणार साखरपुडा? 'मिस्ट्री मॅन' सोबतचा फोटो शेअर, कॅप्शनमधून सगळंच सांगून टाकलं

रणवीर सिंहची एक्झिट! 'हा' अभिनेता साकारणार नवा 'डॉन', तिसऱ्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट

रणवीर सिंहची एक्झिट! 'हा' अभिनेता साकारणार नवा 'डॉन',  तिसऱ्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट

सनी लिओनीच्या कार्यक्रमाला साधू संतांकडून विरोध; बार मालकानं घेतला मोठा निर्णय, नेमकं घडलं काय?

सनी लिओनीच्या कार्यक्रमाला साधू संतांकडून विरोध; बार मालकानं घेतला मोठा निर्णय, नेमकं घडलं काय?

Ikkis Director Shriram Raghavan On Dhurandhar: 'धुरंधर'सारखा सिनेमा बनवणं मूर्खपणा ठरेल...; बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या सिनेमाबाबत असं का म्हणाला बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक?

Ikkis Director Shriram Raghavan On Dhurandhar: 'धुरंधर'सारखा सिनेमा बनवणं मूर्खपणा ठरेल...; बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या सिनेमाबाबत असं का म्हणाला बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक?

Suspense Thriller Marathi Movie Case Number 73: चार खून, शून्य पुरावे... मुखवट्यामागील गडद रहस्य 'केस नं. 73'; डोकं भंडावून सोडणारा मराठी सिनेमा

Suspense Thriller Marathi Movie Case Number 73: चार खून, शून्य पुरावे... मुखवट्यामागील गडद रहस्य 'केस नं. 73'; डोकं भंडावून सोडणारा मराठी सिनेमा

टॉप न्यूज़

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली

नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट

नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी