Richard Roundtree Passed Away : अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन; 'ब्लॅक अॅक्शन हिरो'ने वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Richard Roundtree Dies : 'ब्लॅक अॅक्शन हिरो' म्हणून लोकप्रिय असलेले अभिनेते रिचर्ड राउंडट्री यांचे निधन झाले आहे.
Richard Roundtree : 'ब्लॅक अॅक्शन हिरो' म्हणून जगभरात लोकप्रिय असणारे अभिनेते रिचर्ड राउंडट्री (Richard Roundtree) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पॅनक्रिएटिक कर्करोगामुळे (Pancreatic Cancer) त्यांचे निधन झाले आहे. रिचर्ड यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पहिल्याच सिनेमाने केलेलं सुपरस्टार!
हॉलिवूड पब्लिकेशन डेडलाईनने रिचर्ड राउंडट्री (American most popular action Hero) यांच्या निधनाची बातमी दिली आहे. 1971 मध्ये आलेल्या 'शाफ्ट' या सिनेमाच्या माध्यमातून रिचर्ड यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. या पहिल्याच सिनेमाने त्यांना रातोरात सुपरस्टार केलं. अमिरिकेच्या इतिहासतला हा पहिलाच ब्लॅक्सप्लिटेशन सिनेमा आहे. 'शाफ्ट' (Shaft) या सिनेमात रिचर्ड यांनी खासगी गुप्तहेराची भूमिका साकारली होती. दमदार कथानक आणि रिचर्डच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. या सिनेमाच्या यशानंतर अनेक सीक्वेल्स आणि छोट्या पडद्यावरील मालिकाही आल्या आहेत.
Actor Richard Roundtree has died at the age of 81. pic.twitter.com/TOfBMGmGZ5
— Pop Base (@PopBase) October 25, 2023
रिचर्ड (Black Action Hero) यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आफ्रिका आणि अमेरिकेच्या मनोरंजनसृष्टीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. सिनेसृष्टीतील त्यांचं योगदान विसरता येणार नाही. रिचर्ड राउंडट्री हे अमिरेकेचे पहिले ब्लॅक अॅक्शन हीरो आहेत. रिचर्ड यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
रिचर्ड राउंडट्री यांच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Richard Roundtree Movies)
रिचर्ड राउंडट्री यांनी 'शाफ्ट' या सिनेमाच्या यशानंतर 'शाफ्ट इन अफ्रीका','स्टील','मूविंग ऑन','मॅन फ्रायडे' सारख्या अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. रिचर्ड यांची दोन लग्न झाली आहेत. 1963 मध्ये मॅरी जेनसोबत ते लग्नबंधनात अडकले. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 1973 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये करीन सेरेनासोबत दुसरा संसार थाटला. रिचर्ड यांना निकोल, टेलर, मॉर्गन आणि केली या चार मुली आहेत.
रिचर्ड राउंडट्री वयाच्या 29 व्या वर्षी सुपरस्टार झाले होते. पाच दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीवर राज्य केलं आहे. रिचर्ड यांनी मॉडेलिंगच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हॉलिवूडच्या अनेक सिनेमांत, नाटकांत आणि मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या