एक्स्प्लोर

आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना भेटलेही नाही : रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty Statement on Aditya Thackeray | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने मोठं वक्तव्य केलं आहे. आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही, असं रियाने म्हटलं आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीने मोठं वक्तव्य केलं आहे. "आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही," असं रियाने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केल्यामुळे राजकारण तापलं आहे. अशातच रिया चक्रवर्तीचं वक्तव्य महत्त्वाचं समजलं जात आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करायचा की सीबीआयने यासंदर्भातील दाखल याचिकेवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान विरोधी पक्षाच्या वकिलांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं होतं. तसंच विरोधकांकडूनही सातत्याने आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात होता. यावरुन स्वत: आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिकाही मांडली होती. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं.

त्यावर आता रियानेच आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, "मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही. त्यांना कधीही भेटले नाही. तसचं कधी फोन वर सुद्धा बोलणं झालं नाही. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल ऐकलं आहे."

कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील या प्रकरणात जाहीर भूमिका मांडली. "मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये," असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.

माझ्याविरोधात काहीही संशयास्पद मिळालेलं नाही : रिया रिया म्हणाली की, "मी सुशांतकडून कधीही पैसे घेतले नाही. मुंबई पोलीस आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी सगळ्या दस्तऐवजांची तपासणी केली आहे. त्यांना माझ्याविरुद्ध काहीही संशयास्पद सापडलेलं नाही." तसंच मी तिसऱ्या तपास यंत्रणेच्या चौकशीसाठी तयार असल्याचंही रियाने म्हटलं.

मुंबई पोलीस आणि ईडीने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक, फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवाल घेतला आहे. बँक स्टेटमेंट, इन्कम टॅक्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर और इलेक्ट्रोॉनिक डेटा हे सगळं दोन्ही यंत्रणांकडे आहे, पण माझ्याविरोधात काहीही संशयास्पद सापडलेलं नाही, असं रिया म्हणाली.

रियाने म्हटलं आहे की, मीडियाने कोणत्याही अटकळ बांधू नये. माझं मौन माझा कमकुवतपणा नाही. सत्य कधीही बदलत नाही. मृत्यूच्या 40 दिवसांनंतर बिहार पोलिसांचं समोर येणं हास्यास्पद आहे. सुशांतच्या कुटुंबीयांचे आरोप बिनबुडाचे आहेत. सुशांत वारंवार कुटुंबाला फोन करत होता.

संबंधित बातम्या

शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंविरोधात कारस्थान करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल : संजय राऊत

साहब को बुरा लगेगा इसलिये?'; कंगनाच्या रडारवर आता आदित्य ठाकरे

SSR Suicide Case | मी आदित्य ठाकरे यांना कधीच भेटले नाही : रिया चक्रवर्ती
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Bishnoi Gang Targets Aamir Khan: 'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, सोशल मीडियावर धमकी
'स्टारडमच्या नावाखाली लव्ह जिहाद, श्वासही घ्यायला देणार नाही...'; आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर, जीवेमारण्याची धमकी
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget