Rekha : अभिनेत्री रेखाची 'ती' भयावह कथा आजही थरकाप उडवते, जेव्हा सौंदर्यचं 'शत्रू' झालं होतं!
Rekha Untold Story : अभिनेत्री रेखा यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. रेखा यांच्याबद्दलचे किस्से ऐकायला चाहत्यांना नेहमीच आवडतात. सौंदर्यचं तिचा शत्रू ठरला होता.
Rekha Untold Story : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा (Rekha) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या अभिनयाचा आणि सौंदर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये रेखाचा समावेश होतो. रेखाने आजवर एका पेक्षा एक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रेखाचं व्यावसायिक कामांसह वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. पण एकेकाळी आपलं सौंदर्यचं रेखाला त्रासदायक ठरलं होतं. रेखासह हजारो लोकांना तिचं सौंदर्य अस्वस्थ करत होतं. रेखासोबत 'उमराव जान'मध्ये काम करणाऱ्या शुमार फारुख शेखने याबद्दल भाष्य केलं आहे.
काय आहे किस्सा?
फारूख शेखने एका मुलाखतीदरम्यान 1986 मधील 'उमराव जान' या चित्रपटाबद्दल भाष्य केलं. शूटिंगबाबतचा एक किस्सा शेअर करत फारुख शेख म्हणाले,"उमराव जान' या चित्रपटात मी नवाबच्या भूमिकेत होतो. लखनौजवळील मलिहाबाद येथील एका जुन्या घरात या चित्रपटाचं शूटिंग होत होतं. रेखा आणि माझा रोमँटिक सीन शूट होणार असल्याचं समस्त गावकऱ्यांना कळलं. संपूर्ण गावाला रेखाला रोमान्स करताना पाहायचं होतं. पण खोली छोटी असल्याने गावकऱ्यांना हे पाहणं शक्य होत नव्हतं".
फारुख शेख पुढे म्हणाला,"गावाला बाकी चित्रपटाच्या शूटिंगपेक्षा रोमँटिक सीन पाहण्यात दास्त रस होता. काहींना हा सीन पाहता आला तर काहींना पाहता आला नाही. रेखाला पाहण्यासाठी गावकऱ्यांमध्ये प्रचंड भांडणं झाली. त्यांनी बंदूकदेखील काढली. एकंदरीत त्रासदायक वातावरण निर्माण झालं होतं. रेखाची ही भयावह कथा आजही थरकाप उडवते. तिचं सौंदर्यचं शत्रू झालं होतं".
'उमराव जान'ला प्रेक्षकांची पसंती
मुजफ्फर अली दिग्दर्शित 'उमराव जान' हा चित्रपट 1981 मध्ये सुपरहिट ठरला होता. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटातील 'दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए' हे गाणं आजही संगीतप्रेमी आवडीने ऐकतात. या गाण्यातील रेखाचे भाव आणि नृत्य चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
कोण आहे रेखा? (Who is Rekha)
रेखा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हिंदीसह 1980 मध्ये आलेल्या 'फटाकडी' या चित्रपटातही तिने काम केलं आहे. या चित्रपटातील 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला' या गाण्याची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. रेखा या राजकारणातदेखील सक्रीय आहे. रेखा यांचे खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर हे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
संबंधित बातम्या