एक्स्प्लोर

Ravi Kishan : ''आम्ही खोटं बोलतोय मग DNA चाचणी करा''; रवी किशनच्या कथित मुलीचे आव्हान

Ravi Kishan : रवी किशन यांच्या पत्नीने अपर्णा आणि त्यांच्या मुलीच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे. आता, शिनोवाने आपले कथित वडील रवी किशन यांनाच आव्हान दिले आहे.

Ravi Kishan :  काही दिवसांपूर्वी अपर्णा ठाकूर (Aparna Thakur) नावाच्या एका महिलेने  भोजपुरी स्टार आणि भाजपचे उमेदवार रवी किशन (Ravi Kishan) हे आपले पती असून आपली 25 वर्षीय मुलगी शिनोवा (Shinova) ही त्यांचीच असल्याचा दावा केला होता. अपर्णा ठाकूर यांनी केलेल्या आरोपानंतर रवी किशन यांच्या पत्नीने अपर्णा आणि त्यांच्या मुलीच्या विरोधात पोलीस तक्रार केली आहे. आता, शिनोवाने आपले कथित वडील रवी किशन यांनाच आव्हान दिले आहे. 

शिनोवाने केली महत्त्वाची मागणी 

रवी किशन यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने  रवी किशन यांना उद्देशून म्हटले की, जर आमच्या आरोपात काही तथ्य नसेल तर तुम्ही स्वत: समोर येऊन आरोपांना उत्तर का देत नाही? तुम्ही फक्त डीएनए चाचणी करावी अशी मागणी करत आहे. तुम्ही या प्रकरणावर काहीही बोलतही नाही, ना कोणत्या प्रश्नांना उत्तर देत आहात. माझे कुटुंबीय, एक वकील आणि इतकंच नव्हे तर एका पत्रकाराविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

शिनोवाने पुढे म्हटले की, ते माझे वडील आहेत आणि त्यांनी माझा स्वीकार करावा, हे सांगण्याचा मला अधिकार आहे आणि मी आज अचानक सांगत नाहीये. यादरम्यान अनेक गोष्टी घडल्या असल्याचे शिनोवाने म्हटले. पण, त्या घटनांबद्दल फारसं बोलू शकत नाही. 

शिनोवा पुढे म्हणाली की, तिला खूप कॉल येत असल्याने तिने फोन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ती म्हणाली, 'यावेळी फक्त मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला जात आहे. आपण सर्वजण मिळून अनेक गोष्टींना तोंड देत आहोत, असेही तिने सांगितले. 

प्रकरण काय?

अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेत रवि किशन यांच्यावर आरोप केले आहेत. यावेळी या महिलेने स्वत: भाजप खासदाराची पत्नी असल्याचा दावा देखील केला. तसेच त्यांना एक मुलगी असून त्यांच्या मुलीला तिचे हक्क द्यायचे असल्याचं देखील या महिलेने म्हटलं आहे. 1996 मध्ये त्यांचं लग्न झाले होते. त्यांच्या लग्नात कुटुंबीय आणि मित्रमंडळी देखील सहभागी झाले असल्याचा दावा अपर्णाने केला होता. दरम्यान रवि किशन यांची मुलगी असल्याचा दावा आपल्या मुलीला तिचे हक्क मिळत नसल्याने पत्रकार परिषद घेत असल्याचं या महिलेने म्हटले आहे. 

पत्रकार परिषदे दरम्यान अपर्णा ठाकूर हिनं म्हटलं की, जेव्हा आमची मुलगी 15 वर्षांची होती, तेव्हा तिला कळालं की रवि किशन तिचे वडिल आहेत. त्याआधी ती त्यांना काका बोलायची. ते तिच्या वाढदिवसाला घरी देखील यायचे. पण एका वडिलांसारखे ते कधीच तिच्यासोबत नव्हते. मागील चार वर्षांपासून रवि किशन यांनी त्यांच्यासोबत कोणताही संपर्क केला नसल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget