Vampires of Vijayanagar : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची हॉरर युनिवर्समध्ये एन्ट्री, आयुष्मानसोबत या चित्रपटात झळकणार
Vampires of Vijayanagar : श्रद्धा कपूर, राजकुमार राव, कृति सेनन आणि वरुण धवन यांच्यानंतर आता आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाही हॉरर चित्रपटांकडे वळताना दिसत आहेत.
मुंबई : नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हॉरर युनिवर्समध्ये (Horror Universe) एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. गोड हास्य आणि निरागस चेहऱ्यामुळे रश्मिका मंदाना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. रश्मिका आता हॉरर चित्रपटात झळकणार आहे रश्मिका मंदाना अभिनेता आयुष्मान खुरानासोबत (Ayushmann Khurrana) हॉरर कॉमेडी चित्रपटात (Vampires of Vijayanagar) रोमान्सचा तडका लावताना दिसणार आहे.
रश्मिका-आयुष्मानची हॉरर युनिवर्समध्ये एन्ट्री
सध्या बॉलिवूडमध्ये हॉरर कॉमेडी चित्रपटांची चलती आहे. एकीकडे मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा 100 कोटींची टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे स्त्री 2 चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यापासून प्रेक्षकांना त्याची प्रतीक्षा आहे. यातच आता रश्मिका मंदानाही हॉरर कॉमेडी रोमान्स चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि दिनेश विजान यांच्या आगामी हॉरर चित्रपटात रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना झळकणार आहेत.
'वॅम्पायर्स ऑफ विजय नगर' चित्रपटात मुख्य भूमिकेत
श्रद्धा कपूर, राजकुमार राव, कृति सेनन आणि वरुण धवन यांच्यानंतर आता आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाही हॉरर चित्रपटांकडे वळताना दिसत आहेत. रश्मिका मंदाना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि दिनेश विजान यांच्या 'वॅम्पायर्स ऑफ विजय नगर' या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुरानासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
आयुष्मान आणि रश्मिका मंदानाचा रोमान्स
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि दिनेश विजान यांच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी मुख्य कलाकारांनी निवड झाली आहे. 'वॅम्पायर्स ऑफ विजय नगर' (Vampires of Vijayanagar) या चित्रपटात आयुष्मान आणि रश्मिका मंदाना हॉरर डेब्यू करताना दिसतील. आयुष्मानने याआधी दिनेश विजानसोबत 'बाला' चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
चित्रपटासाठी समंथाचं नाव चर्चेत, रश्मिकाची निवड
आयुष्मान खुराना आणि दिनेश विजान यांच्यात बऱ्याच काळापासून 'वॅम्पायर्स ऑफ विजय नगर' चित्रपटाबाबत चर्चा सुरु होती. या चित्रपटासोबत अभिनेत्री समंथा प्रभूचं नाव देखील जोडलं जात होतं. मात्र, आता या चित्रपटासाठी रश्मिकाची निवड झाल्याचं समोर आलं आहे. या वर्षाअखेरपर्यंत या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होऊ शकते. या चित्रपटाची संपूर्ण प्लॅनिंग झाली असल्याचंही समोर आलं आहे. या चित्रपटातील रश्मिका आणि आयुष्मान यांच्या भूमिका देखील काहीशा वेगळ्या असणार आहेत. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे.