Rashmika Mandanna : बॉलिवूड डेब्यू आधीच रश्मिकाने वाढवलं मानधन! एका चित्रपटासाठी घेणार ‘इतकी’ फी!
Rashmika Mandanna : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे.
Rashmika Mandanna : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. लवकरच ती महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘गुड बाय’ (Good Bye) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच रश्मिकाने आपल्या मानधनात अर्थात फीमध्ये वाढ केली आहे. अल्लू अर्जुनसोबतच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे रश्मिकला तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर रश्मिकाला आगामी चित्रपटात घेण्यासाठी अनेक निर्मात्यांची रांग लागली आहे.
लवकरच रश्मिका अभिनेता अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’मध्ये (Pushpa 2) झळकणार आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘पुष्पा 2’ची देखील क्रेझ निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे साऊथमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर आता रश्मिका तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झाली आहे.
रश्मिका मंदनाने वाढवलं मानधन!
Koimoi वेबसाईटच्या बातमीनुसार, रश्मिका मंदनाने (Rashmika Mandanna) ‘पुष्पा 2’साठी 4 कोटी रुपये फीची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, हा चित्रपट रिलीज होण्याआधीच रश्मिकाने तिची फी वाढवून तब्बल 5 कोटी केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या रश्मिका प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे रश्मिका आपल्या आगामी चित्रपटात झळकावी यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. मात्र, वाढती प्रसिद्धी पाहून अभिनेत्रीने तिचे मानधन देखील वधारले आहे.
'गुडबाय’मधून करणार बॉलिवूड डेब्यू
रश्मिका (Rashmika Mandanna) आणि बिग बी स्टारर 'गुडबाय' या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या संदर्भातील अपडेटची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून साऊथ क्वीन रश्मिका मंदना बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
रश्मिकाच्या ‘पुष्पा 2’ची चर्चा!
'पुष्पा: द रूल' या चित्रपटात 'पुष्पा: द राईज' प्रमाणेच प्रेक्षकांना ड्रामा, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. 'पुष्पा: द रूल' हा चित्रपट जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटातील डायलॉग, कथानक आणि चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा 2' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा: द रूल' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदना हे पहिल्या भागातील कलाकार दिसणार आहेत. तसेच, 'पुष्पा 2'मध्ये विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.