एक्स्प्लोर

Salman Khan Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिकासोबत भाईजानचा रिल लाईफ रोमान्स; पुढच्या ईदला दबंग खानची चाहत्यांना खास ईदी

Salman Khan Rashmika Mandanna : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत आता रश्मिका मंदाना झळकणार आहे. दोघेही पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळणार असल्याचे वृत्त आहे.

Salman Khan Rashmika Mandanna :  यंदाच्या रमझान ईदला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण,  त्याने आपल्या चाहत्यांना निराश न करता 'सिंकदर' या चित्रपटाची घोषणा केली. भाईजानने दिलेल्या या ईदीवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. 'सिंकदर' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सलमानसोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा सुरू होती. आता रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सलमान सोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करणार आहेत. 

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची दक्षिणेत जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. पण अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदी भाषिक पट्ट्यात तिच्या चाहत्यांची संख्या वाढली. 'ॲनिमल'मध्ये तिने रणबीर कपूरची पत्नी गीतांजलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता रश्मिका थेट भाईजानच्या चित्रपटात  झळकणार आहे. 

यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर सलमान खानने सिकंदरची घोषणा केली होती. पुढच्या वर्षी ईदला तो सिकंदरच्या भूमिकेत येत असल्याचे सलमानने सांगितले होते. आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'गजनी'चे दिग्दर्शक एआर मुरुगदास यांनी साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

सलमान रश्मिकाचा पहिलाच चित्रपट.... 

'पिंकविला'ने दिलेल्या वृत्तानुसार, रश्मिकाचा सलमानसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. निर्माते साजिद नाडियादवाला या चित्रपटासाठी नव्या जोडीच्या शोधात होते. त्यांनी आपल्या चित्रपटाची स्क्रिप्ट रश्मिकाला ऐकवली आहे. त्यानंतर ती चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

कधी सुरू होणार चित्रपटाचे शूटिंग?

या चित्रपटाचे चित्रीकरण जून महिन्यापासून सुरू होणार  असल्याची माहिती आहे. पुढील वर्षी ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होत आहे. सलमान आणि रश्मिकाच्या जोडीला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. 

'सिंकदर' असणार अॅक्शनपट?

ए. आर. मुरुगदास सिंकदरचे दिग्दर्शन करणार असल्याने या चित्रपटात अॅक्शनचा तडका असणार असल्याची शक्यता आहे.  या आधी ए. आर. मुरुगदास यांनी गझनी सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. रोमँटिक-अॅक्शनपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्याशिवाय, त्यांनी हॉलिडे: ए सोल्जर इस नेवर ऑफ ड्युटी या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे. त्याशिवाय मुरुगदास यांनी तामिळ सिनेइंडस्ट्रीत काही हिट चित्रपट दिले आहेत. आता, साजिद नाडियाडवाला, मुरुगदास आणि सलमान खान हे त्रिकुट एकत्र येत असल्याने चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget