(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rashmika Mandanna: रश्मिका डीपफेक व्हिडीओ प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये; एफआयआर दाखल
रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरण दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एफआयआर नोंदवला आहे.
Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) काही दिवसांपूर्वी डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल झाला. रश्मिकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक कलाकारांनी याबाबत संताप व्यक्त केली. आता या प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एफआयआर नोंदवला आहे.
एफआयआर दाखल
"रश्मिका मंदानाच्या डीपफेक एआय-जनरेटेड व्हिडिओच्या संदर्भात, आयपीसी, 1860 च्या 465 आणि 469 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 66C आणि 66E अंतर्गत पीएस स्पेशल सेल, दिल्ली पोलिस येथे एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे: दिल्ली पोलिस"
पोलिसांनी मेटाला लिहिलं पत्र
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटाला पत्र लिहिले आहे. ज्या अकाऊंटवरुन अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा 'डीपफेक' व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेला होता त्याचे URL देण्यात यावं असं, या पत्रात लिहिलं आहे.
In regard to the deepfake AI-generated video of Rashmika Mandana, an FIR u/s 465 & 469 of the IPC, 1860 and section 66C & 66E of the IT Act, 2000 has been registered at PS Special Cell, Delhi Police and an investigation has been taken up: Delhi Police
— ANI (@ANI) November 10, 2023
दिल्ली महिला आयोगाने (DCW) रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाची दखल घेतली होती. आयोगाने शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली होती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, व्हिडीओमध्ये मंदानाच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. आयोगाने पोलिसांना या प्रकरणात नोंदवलेल्या एफआयआरची प्रत, आरोपींचा तपशील आणि या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 17 नोव्हेंबरपर्यंत मागितला.
कलाकारांनी व्यक्त केला संताप
नागा चैतन्य, मृणाल ठाकूर आणि चिन्मयी श्रीपाद यांनी सोशल मीडियावर शेअर करुन रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन हा व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्याची मागणी केली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकान व्यक्त केल्या भावना
डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रश्मिकानं ट्वीट शेअर करुन तिच्या भावना व्यक्त केल्या. तिनं ट्वीटमध्ये लिहिलं, "हे शेअर करताना मला खूप दु:ख होत आहे आणि माझा डीपफेक व्हिडीओ ऑनलाइन पसरवला जात आहे त्याबद्दल मला बोलायचे आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही, प्रत्येकासाठी हे अत्यंत भीतीदायक आहे कारण तंत्रज्ञानाचा असा दुरुपयोग केला जात आहे."
इतर महत्वाच्या बातम्या:
Rashmika Mandanna: "माझं शरीर अन् तिचा चेहरा", 'त्या' फेक व्हिडीओवर झारा पटेल बोलली!