Rashmi rocket new song : Taapsee Pannu च्या Rashmi Rocket चित्रपटातील गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला
तापसी पन्नूचा रश्मी रॉकेट चित्रपट 15 ऑक्टोबरला दसऱ्यादिवशी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे
Rashmi rocket new song : बॉलिवूडचा रश्मी रॉकेट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटातील 'घनी कूल छोरी' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तापसी पन्नूच्या चित्रपटातील हे गाणे नवरात्र रंगतदार करणार आहे. या गाण्यातून रश्मी कुल अंदाजात दिसून आली आहे. त्यामुळे चित्रपटातदेखील तिचा लूक कूल असणार आहे. तिच्या या चित्रपटात नाट्यअसणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर ZEE5 वर 15ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकताच रश्मी रॉकेट चित्रपटाचा ट्रेलर ZEE5 च्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
तापसी पन्नूनेदेखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रश्मी रॉकेट चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. चित्रपटातील हे पहिलेच गाणे असल्याचे तापसीने चाहत्यांना सांगितले. हे गाणे खास नवरात्र सणावर आधारित आहे. त्यामुळे हे गाणे नवरात्र आणखी रंगतदार करणार आहे. या गाण्याच्या जोशमुळे उत्साह देखील वाढतो आहे. हे गाणे ऐकूण प्रेक्षक जागीच नाचायला लागतील. काही दिवसांपूर्वीच
चित्रपटाचा टीजरदेखील प्रदर्शित झाला आहे.
नव्या गाण्यात तापसी पारंपारिक लूकमध्ये दिसून येणार आहे. तिने लेहेंगाच्या खाली शूज घातलेले आहेत. त्यामुळे ती या चित्रपटातून एक वेगळा प्रयोग करताना दिसून येणार आहे. घनी कूल छोरी गाण्यातील तिच्या पारंपारिक वेषभूषेसोबत तिचा कूल लूकदेखील चांगलाच भाव खाऊन गेला आहे. गाण्यात तिने खास ड्रेस घातला आहे.
रश्मी रॉकेट चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात आणि मुंबईत करण्यात आले होते. तापसी पन्नूचा हा चित्रपट 15 ऑक्टोबरला दसऱ्यादिवशी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
ऑक्टोबर महिना सिनेमांचा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. पण आता राज्य सरकारने सिनेमागृहे सुरू होण्याची परवानगी दिल्यापासून अनेक सिनेमांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. डिबुक, रश्मी रॉकेट अशा अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे.