![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Tum Kya Mile Song: 'आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं'; रणवीरनं शेअर केला 'तुम क्या मिले' गाण्याचा खास व्हिडीओ
रणवीरनं 'तुम क्या मिले' (Tum Kya Mile) या गाण्याचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
![Tum Kya Mile Song: 'आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं'; रणवीरनं शेअर केला 'तुम क्या मिले' गाण्याचा खास व्हिडीओ Ranveer Singh shares his goofy version of Tum Kya Mile song video viral on social media Tum Kya Mile Song: 'आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं'; रणवीरनं शेअर केला 'तुम क्या मिले' गाण्याचा खास व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/01/3f54d8b7b89d4135b1a935fe6b7113581688205025275259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tum Kya Mile Song: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील 'तुम क्या मिले' (Tum Kya Mile) हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आलियानं या गाण्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आलिया समुद्रकिनारी 'तुम क्या मिले' या गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. आता रणवीरनं देखील या गाण्यावरील खास व्हिडीओ शेअर केला आहे.
रणवीरनं 'तुम क्या मिले' या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, ' आलियाच्या रील एवढं बजेट नव्हतं.' हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन रणवीरनं आलियाला टॅग केलं आहे.
रणवीरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आलियानं रणवीरच्या व्हिडीओवर कमेंट केली, 'Legend!'
पाहा रणवीरचा व्हिडीओ:
View this post on Instagram
पाहा आलियाचा व्हिडीओ:
View this post on Instagram
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
रॉकी और रानी की प्रेम कहानी 'या' दिवशी होणार रिलीज
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर यांच्यासोबतच जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)