Ranveer Singh Net Worth : आलिशान घर...महागड्या गाड्या; रणवीर सिंह कोट्यवधींचा मालक
Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने अनेक सिनेमांत काम केलं आहे.
Ranveer Singh Net Worth : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बाजीरावने अनेक सिनेमांत काम केलं आहे. आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत रणवीरचे नाव घेतलं जातं. न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेला रणवीर कोट्यवधींचा मालक आहे.
रणवीर सिंहची कमाई
रणवीर सिंह अनेक सिनेमांत आणि जाहीरातींत काम करत असतो. रिपोर्टनुसार, रणवीर प्रत्येक सिनेमासाठी 10 ते 12 कोटींचे मानधन घेतो. पण जाहीरातींमधून तो चांगले पैसे कमवतो. सेलिब्रिटीज नेटवर्थ वेबसाईटनुसार रणवीरकडे 240 कोटींची संपत्ती आहे.
रणवीरची प्रॉपर्टी
रणवीर सिंहचे आलिशान घर आहे. रणवीरचा मुंबईत सी-फेस फ्लॅट आहे. तसेच त्याचे आठ कोटींचे घर आहे. तसेच गोव्यातदेखील त्याचा एक आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत 15 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. रणवीर आणि दीपिकाने नुकतेच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 119 कोटींचे घर घरेदी केलं आहे.
View this post on Instagram
कार कलेक्शन
रणवीरकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. रणवीरच्या कलेक्शनमध्ये जगुआर एक्सएलजे, मर्सिडीज बेंज ई क्लास, मर्सिडीज मॅबेक जी एल एस 600, लंबोर्गनी, टोयटा लॅंड क्रूझर या गाड्यांचा समावेश आहे. सध्या रणवीर त्याच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगदरम्यान व्यस्त आहे.
संबंधित बातम्या