एक्स्प्लोर

रणवीर सिंग-दीपिका पदुकोणच्या लग्नाचे खास फोटो

इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या 'विला डेल बालबिअॅनेलो' (villa del balbianello) या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये 'दीपवीर'चा कोंकणी पद्धतीन शाही विवाहसोहळा काल पार पडला.

रोम : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. रणवीर आणि दीपिका यांनी एकाच वेळी सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. रणवीर-दीपिका काल इटलीत विवाहबंधनात अडकल्यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या 'विला डेल बालबिअॅनेलो' (villa del balbianello) या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये 'दीपवीर'चा कोंकणी पद्धतीन शाही विवाहसोहळा काल पार पडला. त्यानंतर आज सिंधी पद्धतीने दोघांनी लग्न केलं. रणवीर सिंग-दीपिका पदुकोणच्या लग्नाचे खास फोटो या विवाह सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या लग्नाला उपस्थित होते. अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लग्नाला उपस्थित असल्याची माहिती आहे. दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी काल लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. रणवीर सिंग-दीपिका पदुकोणच्या लग्नाचे खास फोटो रणवीरची ग्रँड एन्ट्री लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत आणि मेहंदी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दीपिका आणि रणवीरनेच पाहुण्यांचं स्वागत केलं. शुभा मुदगल यांच्या गायनाने दीपिका भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले, असं म्हटलं जातं. तर रणवीरने 'तुने मारी एन्ट्रिया' गाण्यावर डान्स करत प्रवेश केला. रणवीरने स्वतः ढोल वाजवत संगीत सोहळ्याची शान वाढवली. रणवीरने गुडघ्यावर बसून दीपिकाचा हात हातात घेतला आणि अंगठी घातली. 23 नोव्हेंबरला बंगळुरुमध्ये दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रणवीर-दीपिका 10 नोव्हेंबरला कुटुंबीयांसह इटलीला रवाना झाले होते. पाच वर्षांची प्रेमकहाणी रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. 'गोलियों की रासलीला - रामलीला', बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा तीन चित्रपटांमध्ये रणवीर-दीपिकाने एकत्र काम केलं आहे. सुरुवातीला दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधांविषयी बोलणं टाळलं होतं, तरीही चाहत्यांनी दोघांच्या लग्नाची अटकळ बांधली होतीच. मात्र 21 ऑक्टोबरला थेट लग्नाची पत्रिका शेअर करत रणवीर-दीपिकाने चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. यापूर्वी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही इटलीतच साता जन्माच्या गाठी बांधल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूडमधलं आणखी एक कपल याच देशात विवाहबंधनात अडकलं.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
Embed widget