Ranveer Singh Filmfare : फिल्मफेअर स्वीकारताना रणवीर झाला इमोशनल; म्हणाला,'हे आहे माझ्या यशाचं रहस्य...'
नुकताच रणवीरनं सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला.
Ranveer Singh Filmfare : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. रणवीरच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. नुकताच रणवीरला 83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा 67 वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ नुकताच रणवीरनं सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारताना रणवीर हा भावूक झाला आहे.
रणवीरनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, करण जोहर जेव्हा पुरस्कार विजेत्याचं नाव म्हणजेच रणवीरचं नाव जाहीर करतो, तेव्हा रणवीर स्टेजवर येतो आणि भावनिक भाषण देतो. यावेळी रणवीर त्याच्या आई-वडिलांचे, प्रेक्षकांचे आणि बहिणीचे आभार मानतो. 'माझ्या घरी लक्ष्मी आहे. हे आहे माझ्या यशाचं रहस्य' असं म्हणत रणवीर दीपिकाला स्टेजवर आणतो. हा व्हिडीओ शेअर करुन रणवीरनं याला कॅप्शन दिलं, 'जेव्हा तुमचं स्वप्न खरं होतं.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
रणवीरच्या या पोस्टला कमेंट करुन त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 12 वर्ष रणवीर अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यानं जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केलं आहेत. त्यामधील 16 चित्रपट हे हिट होते. देशातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी रणवीर हा एक अभिनेता आहे.रामलीला,बाजीराव मस्तानी ,पद्मावत,83 या सुपरहिट चित्रपटांमध्ये रणवीरनं काम केलं.
रणवीर लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सोबतच आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :