एक्स्प्लोर

Animal : रणबीरचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; बुर्ज खलिफावर दिसणार 'ॲनिमल'ची झलक

Ranbir Kapoor Film Showcased At Burj Khalifa : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ची झलक बुर्ज खलिफावर दिसणार आहे.

Animal Showcased At Burj Khalifa : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर आणि एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून ते आता सिनेमांची प्रतीक्षा करत आहेत. आता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पावलावर रणबीरनेही पाऊल ठेवलं आहे. रणबीर-रश्मिकाच्या 'अॅनिमल'ची झलक बुर्ज खलिफावर दिसणार आहे.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचा 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमातील काही व्हिडीओ बुर्ज खलिफावर दाखवले जाणार आहेत. 

बुर्ज खलिफावर दिसणार 'अॅनिमल'ची झलक

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या 'अॅनिमल' या सिनेमाचा 60 सेकंदाचा एक खास व्हिडीओ बुर्ज खलिफावर दाखवला जाणार आहे. यावेळी रणबीर कपूर आणि सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा बॉबी देओलदेखील (Bobby Deol) उपस्थित असणार आहे. 

'अॅनिमल' हा सिनेमा सुपरहिट व्हावा यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. शाहरुखच्या सिनेमांची झलक बुर्ज खलिफावर दाखवण्यात आली आहे. आता रणबीरने शाहरुखच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. त्यामुळे आता शाहरुखच्या सिनेमांप्रमाणे रणबीरचा सिनेमाही बॉक्स ऑफिस गाजवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sandeep Reddy Vanga (@sandeepreddy.vanga)

'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप वांगा रेड्डीने सांभाळली आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गँगस्टर कुटुंबियाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर दिसणार आहेत. 

विकी कौशल अन् रणबीर कपूर आमने-सामने

विकी कौशल आणि रणबीर कपूर बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहे. विकी कौशलचा बहुचर्चित 'सॅम बहादूर' हा सिनेमाही 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. दोघांचाही मोठा चाहतावर्ग असून दोन्ही सिनेमांसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता कमाईत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या

Alia Bhatt: 'बेबी टायगर...'; लेकीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आलियाची खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget