एक्स्प्लोर

Ranbir Kapoor : दोन टॉप अभिनेत्रींना डेट केलं आणि धोकेबाज-कॅसेनोवा नाव पडलं; रणबीर कपूरने व्यक्त केली खंत

Ranbir Kapoor Interview : धोकेबाज आणि कॅसेनोवा हे दोन टॅग जीवनाचा एक भाग बनले असल्याचं अभिनेता रणबीर कपूरने सांगितलं आहे.

मुंबई : बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नेहमीच त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सलन लाईफमुळेही चर्चेत असतो. रणबीर कपूरची लव्ह लाईफ कायमच फिल्म इंडस्ट्रीमधील हॉट टॉपिकपैकी एक राहिला आहे. काही अभिनेत्रींना डेट केल्यानंतर रणबीर कपूरने आलिया भटसोबत लग्न केलं. या दोघांना एक गोंडस मुलगी आहे, जिचं नाव राहा आहे. असं असलं तरी धोकेबाज आणि कॅसेनोवा हे दोन टॅग आपल्या जीवनाचा एक भाग बनले असल्याचं रणबीरने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

णबीर कपूरची लव्ह लाईफ कायमच चर्चेत

अभिनेता रणबीर कपूरने बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींना डेट केलं आहे. यामुळे त्याची लव्ह लाईफ कायमच चर्चेत राहिली. याचं कारणामुळे त्याच्यावर प्ले बॉय असल्याचा आरोपही वारंवार झाला. दोन आघाडीच्या अभिनेत्रींना डेट केलं आणि धोकेबाज-कॅसेनोवा नाव पडलं. धोकेबाज आणि कॅसेनोवा हे दोन टॅग त्याचा जीवनाचा एक भाग बनले आहेत असं रणबीरने म्हटलं आहे.

अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव

हँडसम हंक अभिनेता रणबीर कपूरची मोठी फॅन फॉलोईंग आहे. अगदी बॉलिवूड अभिनेत्रीही त्याच्या फॅनमध्ये सामील आहे. अनेक अभिनेत्रींचं नाव रणबीर कपूरसोबत जोडलं गेलं आहे.  टॉप अभिनेत्रींसोबतच्या लव्ह अफेअरमुळे रणबीर कपूरला धोकेबाज आणि कॅसेनोवा असल्याचा आरोप झाला. दीपिका पादुकोण, कतरीना कैफ, सोनम कपूर, प्रियंका चोप्रा, श्रुती हसन यांच्यासोबत रणबीर कपूरचं नाव अनेक वेळा जोडलं गेलं. या आधी कधीही रणबीर कपूरने याबाबत अधिकृतपणे कोणतही वक्तव्य केलं नाही. 

धोकेबाज-कॅसेनोवा हे टॅग आयुष्याचा मोठा भाग

रणबीर कपूरने त्याच्या लव्ह लाईफबद्दल निखिल कामतला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. रणबीर कपूर म्हणाला की, धोकेबाज आणि कॅसेनोवा हे दोन टॅग माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग बनले आहेत आणि तो या टॅगसोबत अनेक वर्ष जगत आहे. पीपल विथ WTF च्या पॉडकास्टमध्ये रणबीर कपूरने धोकेबाज आणि कॅसेनोवा या टॅगबद्द्ल सविस्तर भाष्य केलं आहे.

रणबीर कपूरने दीपिका पादुकोण, कतरिना कैफला केलं डेट

अभिनेता रणबीर कपूरने दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफला डेट केलं आहे. दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर या दोघींनी 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणबीर कपूर सोबतच्या डेटिंग लाइफवर चर्चा केली होती. दीपिका आणि रणबीर तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दीपिकाने ब्रेकअपचं कारण सांगताना रणबीरने धोका दिल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याला 'कॅसेनोवा' टॅग मिळाला. 

'दोन खूप यशस्वी अभिनेत्रींना डेट केलं'

रणबीर म्हणाला की, मी दोन खूप यशस्वी अभिनेत्रींना डेट केलं होतं, जी माझी ओळख बनली. त्यानंतर मला कॅसोनोवा आणि धोकेबाज टॅग दिले गेले. मी वर्षानुवर्षे या टॅगसह जगत आहे. आजही हे दोन्ही टॅग माझ्यासोबत आहेत. मला वाईट वाटतं, पण मग मी स्वतःला समजावतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडीचा जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 08 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAurangzeb Kabar : औरंगजेबाच्या कबरीवरील वादानंतर एनआयएचं पथक दाखलTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aurangzeb Tomb Row : औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
औरंगजेब कबरीवरील वादानंतर NIA पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची पाहणी; जालना, परभणीतील हालचालींवरही लक्ष
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
मंत्री, आमदारांची पगारात वाढ करण्यासाठी विधेयक येणार; मुख्यमंत्र्यांच्या पगारात 100 टक्के वाढ, विरोधी पक्षनेत्याचा 20 हजारांनी वाढणार
Nagpur News: चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडी जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
चार वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, पुलाखाली खेळणाऱ्या चिमुरडीचा जागीच मृत्यू; नागपुरातील घटना 
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
The Diplomat Box Office Collection Day 7: 'सिकंदर'ची हवा अन् 'छावा'चं तुफान, यात गपचूप धुवांधार कमाई करतोय जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट'; कमाईचा आकडा ऐकाल तर...
'सिकंदर'ची हवा अन् 'छावा'चं तुफान, यात गपचूप धुवांधार कमाई करतोय जॉन अब्राहमचा 'द डिप्लोमॅट'; कमाईचा आकडा ऐकाल तर...
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Embed widget