एक्स्प्लोर

Entertainment News : 'भाभी'वर जडलं अभिनेत्याचं प्रेम, कुटुंबाच्या विरोधात जाऊन केलं लग्न, आता आहेत दोन मुलं

Ram Kapoor Love Life : अभिनेता राम कपूर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे, त्याची इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी जाणून घ्या.

Ram Kapoor Love Story : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध नावांपैकी एक म्हणजे अभिनेता राम कपूर. 'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही मालिकेतून अभिनेता राम कपूर हे नाव घराघरात पोहोचलं. रामने फक्त टीव्ही सीरियल नाही तर अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. पण, त्याला खरी प्रसिद्धी सीरियलमधून मिळाली. कसम से, बडे अच्छे लगते हैं या टीव्ही मालिकांसाठी त्याला प्रसिद्धी मिळाली. 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेतील राम कपूर आणि साक्षी तंवर यांची जोडी चाहत्यांच्या खास पसंतीस उतरली.

'भाभी'वर जडलं अभिनेत्याचं प्रेम

राम कपूरला खरी प्रसिद्धी 2006 मध्ये आलेल्या 'कसम से' (Kasamh Se) मालिकेतून मिळाली. या मालिकेमध्ये राम कपूरसोबत अभिनेत्री प्राची देसाई मुख्य भूमिकेत झळकली होती. त्यानंतर 2011 मध्ये आलेल्या 'बडे अच्छे लगते हैं' (Bade Achhe Lagte Hain) मालिकेलाही प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. राम कपूर  सलग तीन वर्षे 2006, 2007 आणि 2008 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा इंडियन टेलि अवॉर्ड जिंकणारे एकमेव अभिनेता आहेत.

मालिकेच्या सेटवर राम-गौतमीची भेट

अभिनेता राम कपूर याने 1997 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. पण, त्याला यश चार वर्षानंतर मिळालं. 2000 मध्ये आलेल्या 'घर एक मंदिर' मालिकेतून त्याच्या कामाचं कौतुक होण्यास सुरुवात झाली. याच मालिकेमध्ये त्याला आयुष्याभराची जोडीदारही मिळाली. राम कपूरने 2003 मध्ये गौतमीसोबत लग्न केलं. या दोघांची भेट 'घर एक मंदिर' मालिकेच्या सेटवर झाली होती. तिथून दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली.

कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न 

राम कपूरने अभिनेत्री गौतमी कपूरसोबत लग्न केलं. 'घर एक मंदिर' मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. या मालिकेत राम कपूर आणि गौतमी कपूर यांनी दीर आणि वहिनीची भूमिका साकारली होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. राम कपूर आणि गौतमी एकत्र काम करताना प्रेमात पडले. दरम्यान, गौतमीने त्याआधी व्यावसायिक छायाचित्रकार मधुर श्रॉफशी लग्न केलं होतं. पण दोघांचा लवकरच घटस्फोट झाला आणि त्यानंतर गौतमी कपूर राम कपूरच्या प्रेमात पडली.

आज आहे सुखी कुटुंब

राम कपूर पंजाबी कुटुंबातला होता आणि गौतमी मराठी कुटुंबातीस होती. त्यामुळे दोघांनीही त्यांच्या नात्याला दोघांच्याही पालकांचा विरोध होता. दोघांच्याही घरच्यांनी त्यांचं नातं मान्य केलं नाही. त्यामुळे दोघांनीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन 14 फेब्रुवारी 2003 रोजी लग्न केलं. आता दोघांना मुलगी सिया आणि मुलगा अक्स अशी दोन मुले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Happy Birthday Vivek Oberoi : ऐश्वर्यावर प्रेम अन् सलमानसोबतचा वाद, बॉलिवूडमध्ये काम मिळणं बंद झाल्यावर विवेक ऑबेरायचं आयुष्य कसं होतं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
Embed widget