एक्स्प्लोर
राकेश रोशन यांच्याकडून हृतिकला बर्थ डेचं खास गिफ्ट
हृतिकने 10 जानेवारी रोजी त्याचा 44 वा वाढदिवस साजरा केला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला त्याच्या वाढदिवशी वडिलांकडून खास गिफ्ट मिळालं आहे. राकेश रोशन यांनी क्रिश 4 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हृतिकने 10 जानेवारी रोजी त्याचा 44 वा वाढदिवस साजरा केला.
क्रिश मालिकेतील क्रिश 4 हा सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार असल्याची माहिती स्वत: राकेश रोशन यांनी ट्विटरवरुन दिली.
माझ्या आयुष्यात तू सूर्यकिरणांसारखा, बर्थ डेनिमित्त हृतिकला सुझानच्या शुभेच्छा!
"क्रिश 4 च्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. ख्रिसमस 2020 चित्रपट रिलीज होणार. हृतिकच्या वाढदिवशी सगळ्यांसाठी खास गिफ्ट. हॅप्पी बर्थ डे हृतिक," असं ट्वीट राकेश रोशन यांनी केलं आहे.
हृतिकचे क्रिश मालिकेतील यापूर्वीचे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते. दरम्यान, हृतिक सध्या 'सुपर 30' ह्या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'सुपर 30' चित्रपट आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे.Today is perhaps the best day to make the release day of Krrish 4 official. Christmas 2020 it is. A gift for all of you on Hrithiks birthday. Happy birthday @iHrithik
— Rakesh Roshan (@RakeshRoshan_N) January 10, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement