एक्स्प्लोर
Advertisement
'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध कायम, 25 जानेवारीला 'भारत बंद'ची हाक
हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे, त्याच दिवशी करणी सेनेने भारत बंदची हाक दिली आहे.
नवी दिल्ली : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असला तरी राजपूत करणी सेनेचा विरोध मात्र कायम आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार आहे, त्याच दिवशी करणी सेनेने भारत बंदची हाक दिली आहे.
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांनी करणी सेनेला एक पत्र लिहिलं आहे, ज्यात एकदा हा सिनेमा पाहा आणि मग मत मांडा, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र सिनेमा पाहणार नसून त्याची होळी करु, असा इशारा करणी सेनेकडून देण्यात आला आहे.
दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने हा सिनेमा सर्व राज्यांमध्ये रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गुजरातमध्ये हा सिनेमा रिलीज न होण्याची चिन्ह आहेत. कारण नुकसानीच्या भीतीने मल्टीप्लेक्स मालकांनी सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीनंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. या विरोधात सिनेमाच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निर्मात्यांना दिलासा देत सिनेमा सर्व राज्यांमध्ये प्रदर्शित करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता.
'पद्मावत' सिनेमाला वाढता विरोध पाहता, राजस्थान सरकारने आधीच सिनेमावरील बंदीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्येही सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली होती.
या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
सिनेमाला वाढता विरोध लक्षात घेऊन, ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. त्याचसोबत, सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांनुसार काही बदलही करण्यात आले. मात्र तरीही सिनेमाला होणारा विरोध कमी झालेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement