(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : पत्रकारावर भडकला अभिनेता राजपाल यादव; व्हायरल दिवाळी व्हिडीओवर प्रश्न विचारताच संताप अनावर, रागात कॅमेरा हिसकावला
Rajpal Yadav Viral Video : अभिनेता राजपाल यादवचे एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्रकाराच्या प्रश्नावर भडकून रागाने कॅमेरा हिसकावताना दिसत आहे.
Rajpal Yadav Diwali Video Controversy : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नुकत्याच रिलीज झालेल्या भूल भुलैया 3 चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकला आहे. एकीकडे चित्रपटाची स्टारकास्ट भूल भुलैया 3 चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात असताना अभिनेता राजपाल यादव वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्रकाराचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पत्रकाराने राजपाल यादव यांना एक प्रश्न विचारला, ज्यानंतर त्याचा पारा चढला आणि त्याने पत्रकाराचा कॅमेरा खेचण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेता राजपाल यादव पत्रकारावर भडकला
अभिनेता राजपाल यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे, ज्यामध्ये तो पत्रकारावर भडकल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये यादव पत्रकाराचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पत्रकाराने त्यांना काही प्रश्न विचारल्यावर ही घटना घडली, त्यानंतर यादव यांचा संताप वाढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर होत आहे.
प्रश्न विचारताच अभिनेत्याचा संताप अनावर
अभिनेता राजपाल यादवचा नुकताच भूल-भुलैया 3 चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवताना दिसत आहे. यादरम्यान, तो वादात सापडला आहे. राजपाल यादवने शेअर केलेल्या दिवाळी व्हिडीओवर वाद निर्माण झाल्याचं दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी राजपालने दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तेव्हापासून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.सोशल मीडियावर आलेल्या नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर राजपाल यादवे आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली, पण तरीही लोकांचा त्यांच्याविरोधातील रोष कमी होताना दिसत नाहीय. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका पत्रकाराला व्हायरल दिवाळी व्हिडीओबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्याचा रागाच्या भरात कॅमेरा खेचताना दिसत आहे.
Rajpal Yadav tried to snatch the mobile phone of a journalist when he asked a question about his statement on Diwali!
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) November 2, 2024
Seems mentally disturbed over social media response?? pic.twitter.com/UWDGC0dMI0
महत्त्वाच्या इतर बातम्या :