![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rajinikanth : काळा चष्मा, लाल टोपी... रजनीकांतचा 'Laal Salaam'मधील लक्षवेधी लूक
Rajinikanth : ऐश्वर्या रजनीकांतच्या आगामी 'लाल सलाम' (Laal Salaam) या सिनेमातील रजनीकांतचा लूक समोर आला आहे.
![Rajinikanth : काळा चष्मा, लाल टोपी... रजनीकांतचा 'Laal Salaam'मधील लक्षवेधी लूक Rajinikanth Firth Look From Laal Salaam Movie Rajinikanth : काळा चष्मा, लाल टोपी... रजनीकांतचा 'Laal Salaam'मधील लक्षवेधी लूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/a4940560edb1aadc5ed03f27b2e002471683540660373254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajinikanth First Look From Laal Salaam Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या चर्चेत आहे. ऐश्वर्या रजनीकांतच्या (Aishwarya Rajinikanth) आगामी 'लाल सलाम' (Laal Salaam) सिनेमातील रजनीकांतचा (Rajinikanth) लूक समोर आला आहे.
ऐश्वर्या रजनीकांत अनेक वर्षांनी 'लाल सलाम' (Laal Salaam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना रजनीकांतची झलकदेखील पाहायला मिळणार आहे. आज या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात रजनीकांत मोइदीन भाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
'लाल सलाम' या सिनेमाच्या पोस्टरमध्ये काळा चष्मा, लाल टोपी आणि शेरवानी असा काहीसा रजनीकांतचा लूक आहे. या लूकमध्ये रजनीकांतला ओळखणंही नेटकऱ्यांना अवघड जात आहे. मोइदीन भाईच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी रजनीकांत सज्ज आहे.
'लाल सलाम'मध्ये दिसणार रजनीकांतची झलक (Laal Salaam Movie First Look)
ऐश्वर्या रजनीकांत गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडूमध्ये शूटिंग करत आहे. या सिनेमात विष्णु विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच रजनीकांतची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्याने सोशल मीडियावर 'लाल सलाम'चं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे,"मोइदीन भाईचं स्वागत आहे"
रजनीकांत (Rajinikanth) 2021 साली 'दरबार' आणि 'अन्नात्थे' या सिनेमात शेवटचा झळकला होता. त्याच्या 'जेलर' या सिनेमाचीदेखील चाहते प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमात ते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्याच्या 'लाल सलाम' या भव्यदिव्य सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. लवकरच या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात येईल.
'लाल सलाम' या सिनेमातील गाणी एआर रहमान संगीतबद्ध करणार आहे. या वर्षाच्या शेवटी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'लाल सलाम' या सिनेमात 90 च्या दशकातील मुंबई दाखवण्यात आली आहे. या सिनेमात क्रिकेटचा महत्त्वाचा रोल असणार आहे. रजनीकांत या सिनेमात गुंडगिरी करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
Aishwarya Rajinikanth: विश्वासू कर्मचाऱ्यांनीच दिला रजनीकांत यांच्या मुलीला दगा; ऐश्वर्या रजनिकांतचे दागिने चोरणारे अटकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)