![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aishwarya Divorce : 18 वर्षांचं नातं तुटलं, ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरुवात; कोर्टात दाखल केला अर्ज
Aishwarya Divorce : दोन्ही परिवारांच्या उपस्थित दोघांचं लग्न झालं होतं. पण आता त्यांनी आपलं नात पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोर्टातील प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आहे.
![Aishwarya Divorce : 18 वर्षांचं नातं तुटलं, ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरुवात; कोर्टात दाखल केला अर्ज Rajinikanth daughter Aishwarya and Dhanush officially file for divorce by mutual consent Entertainment latest update detail marathi news Aishwarya Divorce : 18 वर्षांचं नातं तुटलं, ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या प्रक्रियेला सुरुवात; कोर्टात दाखल केला अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/08/3c22c6a5700dfc81dd10c604c058dcca1712585674724720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aishwarya and Dhanush Divorce : धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) ही दोघं पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहेत. दोघांनी 18 वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. पण या दोघांनी 2018 मध्येच विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा पासून हे दोघेही वेगळे राहतायत. त्यातच आता दोघांनाही घटस्फोटासाठी चेन्नईच्या फॅमिली कोर्टात अर्ज केला आहे.
रिपोर्ट्नुसार, त्यांनी कलम 13 ब अंतर्गत सहमतीने घटस्फोटाची याचिका दाखल केलीये. सहमतीने घटस्फोट घेणं असं कलम 13 बचा अर्थ आहे. आता या दोघांच्याही याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्या दोघांनी 2022 मध्येच त्यांच्या नात्यातील दुराव्याविषयी सांगितलं. त्यानंतर दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांच्या शाळेतील कार्यक्रमांना एकत्र दिसले होते.
2022 मधील पोस्ट काय?
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये धनुषने ट्वीट करत म्हटलं होतं की, 18 वर्षे मित्र, जोडपे, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून एकत्र राहिले. हा प्रवास समजूतदारपणाचा होता. आज आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचे ठरवले आहे आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढला आहे.”
View this post on Instagram
धनुष आणि ऐश्वर्याच्या कामाबद्दल
ही पोस्ट पाहून धनुष आणि ऐश्वर्या काही वेळ दिल्यानंतर आपलं नातं दुरुस्त करतील असं बोललं जात होतं. पण अखेरीस आता या दोघांनीही त्यांचं नातं पूर्णपणे तोडून टाकलंय. र्या रजनीकांत ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील मेगा स्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'कॅप्टन मिलर'मध्ये दिसला होता. ऐश्वर्या रजनीकांतने शेवटचा 'लाल सलाम' दिग्दर्शित केला होता.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)