एक्स्प्लोर

Pushpa 2 Teaser launch Allu Arjun Look : शरीराला निळा रंग, पायात घुंगरू अन् अर्धनारी अवतार; 'पुष्पा 2' टीझरमधल्या अल्लू अर्जुनच्या लूकचा अर्थ काय?

Pushpa 2 Teaser launch Allu Arjun Look : 'पुष्पा 2' च्या टीझरमध्ये अल्लू हा अर्धनारीच्या लूकमध्ये दिसला आहे. या लूकचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Pushpa 2 Teaser launch Allu Arjun Look : अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) वाढदिवसाच्या दिवशी  आज मोस्ट अवेटेड 'पुष्पा 2'चा  (Pushpa 2: The Rule) टीझर आज लाँच झाला. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग दिसून आला. टीझरमध्ये अल्लू अर्जुनच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अल्लू अर्जुनने या टीझरमध्ये साडी नेसली असून संपूर्ण अंगावर निळा रंग आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची अॅक्शन दिसून आली. 

अल्लू अर्जुनने नेसली साडी 

टीझरमध्ये जत्रा होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये अनेक लोक देवीच्या नावाचा जप आणि प्रार्थना करत आहेत. यानंतर अल्लू अर्जुन दिसतो. या टीझरमध्ये अल्लू हा अर्धनारीच्या लूकमध्ये दिसला.  त्याची दाढी, कुरळे केस, चालण्याची पद्धत अगदी मर्दानी दिसते. पण साडी, डोळ्यातील काजळ, लांब नखे, घुंगरू, झुमके, बांगड्या आहेत. याच अवतारात अल्लू अर्जुन गुंडांशी दोन हात करतो. 

मातंगी वेशम

कपड्याशिवाय एका दृश्यात अल्लूने शरीराला निळा रंग लावला आहे.  हा मातंगी अवतार असल्याचे म्हटले जाते.  अशी वेशभूषा साधारणपणे पुरुष अथवा स्त्री तिरुपतीमध्ये गंगम्मा थल्ली जत्रेच्या सहाव्या दिवशी परिधान करतात. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील डाक्को...डाक्को...मेका यामध्ये जत्रेचा संदर्भ देण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून पुष्पाची एक बॅकस्टोरीची पार्श्वभूमी तयार केली. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, गंगम्मा थल्ली जत्रेतील हे दृष्य चित्रपटासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)

'पुष्पा 2 - द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.  या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2'चा समावेश असणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 : The Rule) हा 'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार  आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पाहा टीझर : Pushpa 2 The Rule Teaser | Allu Arjun | Sukumar | Rashmika Mandanna | Fahadh Faasil | DSP

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्तनालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget