Rahul Dravid Aditi Dravid Exclusive : काका, तू बेस्ट कोच आहेस, 'माझा'शी बोलताना द्रविडची पुतणी हळहळली, अभिनेत्री अदिती द्रविड म्हणाली, सर्वात मोठा हार्टब्रेक!
Rahul Dravid Aditi Dravid : मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविड आणि क्रिकेटर राहुल द्रविड यांचं खास नातं आहे.
Rahul Dravid And Marathi Actress Aditi Dravid Connection : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा (India vs Australia world cup final) सहा विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू ज्याप्रमाणे चर्चेत आहेत अगदी त्याचप्रमाणे टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडदेखील (Rahul Dravid) चर्चेत आहेत. क्रिकेटर राहुल द्रविड आणि मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडचं (Aditi Dravid) खास नातं आहे. अदिती ही राहुल द्रविड यांची पुतणी आहे. तसेच विश्वचषकात भारताचा पराभव होणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा हार्टब्रेक असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
राहुल द्रविड प्रचंड मेहनती असून सर्वोत्कृष्ट कोच!
राहुल द्रविड यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना अदिती (Aditi Dravid On Rahul Dravid) म्हणते,"राहुल द्रविड हे माझे काका आहेत. माझे वडील क्रिकेटच्या फिल्डमध्ये गेल्या 30-35 वर्षांपासून कार्यरत आहेत. ते स्वत: रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत. वडिलांच्या क्रिकेटमुळे राहुल द्रविड आणि माझं नातं खूप घट्ट होत गेलं. आज राहुल द्रविडसाठी मला खूप वाईट वाटतंय. हेड कोच म्हणून त्यांचीदेखील टर्म संपत आहे. हा वर्ल्डकप त्याचा शेवटचा होता. तो प्रचंड मेहनती असून खूप कष्ट घेतो. मला वाटतं राहुल द्रविड हा सर्वोत्कृष्ट कोच आहे".
View this post on Instagram
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल अदिती म्हणते...
भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल बोलताना अदिती (Aditi Dravid On India Vs म्हणते,"टॉसपासूनच गणित बिघडायला लागलं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता. टीम इंडिया खूप प्रयत्न करत होती. 240 पण होतील की नाही अशी शंका होती. सर्वच भारतीय टीम इंडियाला सपोर्ट करत होती. शेवटपर्यंत काहीतरी जादू व्हावी असं वाटत होतं. याच्याआधीचे सर्व सामने आपण उत्कृष्ट खेळलो होतो. पण ऑस्ट्रेलियाची टीम खूपच कमाल खेळत होती".
अदिती पुढे म्हणते,"भारताचा पराभव झाल्यानंतर सर्व खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. क्रिकेटप्रेमींना ते चित्र पाहावत नव्हतं. पण आता वर्ल्डकप चार वर्षांनी येणार आहे. त्यावेळची टीम अख्खी वेगळी असू शकते. काल सर्व भारतीयांना आपलाच वर्ल्डकप आहे, असं शेवटपर्यंत वाटत होतं. माझं आतापर्यंतचं हे हर्ट झालेलं हार्टब्रेक आहे. नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे खेळदेखील एक प्रयोगच आहे".
अदिती द्रविडबद्दल जाणून घ्या... (Who Is Aditi Dravid)
अदिती द्रविड ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर अनेक कलाकृतींच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'सुंदरा मनामध्ये भरली','माझ्या नवऱ्याची बायको' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तसेच 'गोष्ट एका पैठणीची' या राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमातही तिने महत्ताची भूमिका साकारली होती. अभिनेत्री असण्यासोबत ती नृत्यांगणा आणि गीतकार आहे.
संबंधित बातम्या